मुंंबई : ता. ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस. सार्या देशात शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या गुरु विषयीचा आदरभाव, मान, सन्मान या दिवशी व्यक्त केला जातो.
अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे सर्व कामकाज आज शाळेच्या विद्यार्थ्यांनी पार पाडले.सकाळची सामुहिक प्रार्थना, विद्यार्थी उपस्थिती घेणे इतकेच काय? तर अध्ययन - अध्यापन प्रक्रिया शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पाडली. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षकीपेशाचा आगळावेगळा अनुभव घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंदराजन श्रीनिवासन यांनी विद्यार्थीदशेतील आव्हाने व यशस्वी गुरुकिल्लीचा मार्ग यावर विद्यार्थ्यांना समुपदेशन केले.




No comments:
Post a Comment