स्वच्छता ही सेवा: महाश्रमदानास जिल्ह्यात प्रतिसाद ; पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 17, 2023

स्वच्छता ही सेवा: महाश्रमदानास जिल्ह्यात प्रतिसाद ; पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ




नांदेड, ता.17 स्वच्छता ही सेवा व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात आज महा श्रमदानातून गावा-गावातून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

      मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिन समारंभा निमित्त दिलेल्या भाषणात पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी इंडियन स्वच्छता लिग 2.0 या विशेष स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केल्याचे जाहीर केले. नागरिकांनी कचरा मुक्त भारत अभियानात सहभागी होऊन गावे शाश्वत स्वच्छ ठेवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

      केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद दिला असून अनेक गावात श्रमदानातून गावे स्वच्छ केली आहेत. शासकीय, निम शासकीय कार्यालय, शाळा, अंगणवाडी, महाविद्यालय, बाजारपेठ, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका स्तरीय अधिकारी, सरपंच, ग्राससेवक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या.


स्‍वच्‍छतेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या गावांचा गौरव 

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 व हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या गावात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचा हस्ते गौरव करण्यात आला. यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये उत्कृष्ट काम करणारीत जिल्ह्यातील 133 गावे तर हागणदारी मुक्त अधिक मॉडेलमध्‍ये 37 गावांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News