बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र महासचिवपदी ऍड.परमेश्वर गोणारे यांची निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 19, 2023

बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र महासचिवपदी ऍड.परमेश्वर गोणारे यांची निवड

 



नांदेड ( डाॅ कैलास कानिंदे ): बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशानुसार बसपाच्या महाराष्ट्र महासचिवपदी नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते ऍड. परमेश्वर गोणारे यांची आज निवड करण्यात आली असून ' बीएसपी आयी है, नई रोशनी लाई है ' ची घोषणाबाजी करीत या निवडीचे आज जल्लोषात स्वागत करण्यात आले.

      बहुजन समाज पार्टीचे केंद्रिय महाराष्ट्र प्रभारी नीतीन सिंग, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मनीषभाऊ कावळे , प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप ताजणे, महासचिव दिंगबर ढोले, प्रदेश सचिव राहुल कोकरे, प्रा. आनंद भालेराव, संघटन मंत्री सखाराम इंगोले, जिल्हाध्यक्ष बळीराम निखाते, नारायण घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील छत्रपती चौक येथील अरिहंत अपार्टमेंट येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज मंगळवार ( ता. १९ सप्टेंबर ) रोजी  दलित, आदिवासी आणि ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऍड. परमेश्वर गोणारे यांना नियुक्ती पत्र देवुन ' बीएसपी आयी है, नई रोशनी लाई है ' ची घोषणाबाजी करीत त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

    यावेळी बहुजन समाज पार्टीचे केंदिय महाराष्ट्र प्रभारी नीतीन सिंग,  प्रदेश प्रभारी मनीषभाऊ कावळे , प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप ताजणे, महासचिव दिंगबर ढोले, प्रदेश सचिव राहुल कोकरे, प्रा. आनंद भालेराव आदींनी मार्गदर्शन पर भाषण करतांना ऍड. परमेश्वर गोणारे यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जि.प.सदस्य, आमदार, खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येक बूथ आणि सेक्टर स्तरावर पक्ष संघटन मजबूत करण्यावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे. शिवाय देशातील सद्या खूपच वाईट अवस्था पाहता सर्व बहुजन समाजाने एकत्रित होण्याची गरज असल्याचे नमूद करून राज्य सरकार शासकीय नोकऱ्या संपुष्टात आणून कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हा जाचक शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने निळे वादळ निर्माण करून विधी मंडळाच्या आगामी अधिवेशनावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते ऍड. परमेश्वर गोणारे यांची बसपाच्या महाराष्ट्र राज्य महासचिवपदी निवड करण्यात आल्यामुळे अनेक मान्यवरांसह समाजाच्या प्रत्येक घटकाकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News