हिंगोली जिल्हा हा जगाच्या नकाशावर वैज्ञानिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल अशा लिगो प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी संसदेत मानले सर्वांचे आभार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, September 22, 2023

हिंगोली जिल्हा हा जगाच्या नकाशावर वैज्ञानिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल अशा लिगो प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी संसदेत मानले सर्वांचे आभार

  



नवी दिल्ली : हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली जिल्ह्याची  हळदीसोबतच शास्त्रज्ञांचा जिल्हा म्हणून एक नविन ओळख जगाच्या पाठीवर ज्या लिगो(LIGO) लॅबमुळे होणार आहे त्या प्रकल्पास 2600 कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी प्रधानमंत्री व केंद्रिय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री यांचे मानले संसदेत आभार.

      हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ  तालुक्यात दुधाळा परिसरात जगातील दुसऱ्या  क्रमांकाची  गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी लिगो ( LIGO ) वेधशाळा स्थापन होणार आहे . मागील 13 वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता . याबाबत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग  यांच्याकडे खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नाने या प्रकल्पास 2600 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लिगो ( LIGO) प्रकल्पाच्या कामास गती येणार आहे. तर भविष्यात हिंगोली जिल्हा हा जगाच्या नकाशावर वैज्ञानिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. असे सर्व सभागृहाला परिचित करून  देताना अधिवेशनादरम्यान चर्चेत सहभागी होताना हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News