मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व खासदारांचे एकमत #खासदार हेमंत पाटील, यांच्या पुढाकाराने लोकसभा-राज्यसभेतील सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, September 22, 2023

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व खासदारांचे एकमत #खासदार हेमंत पाटील, यांच्या पुढाकाराने लोकसभा-राज्यसभेतील सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न

 


नवी दिल्ली :  मागील अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. या साठी खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेऊन लोकसभा आणि राज्यसभेतील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, श्रीनिवास पाटील, शिवसेना नेता राहुल शेवाळे,खा डॉ.  श्रीकांत शिंदे,  माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खा. उन्मेश पाटील, खा. प्रतापराव जाधव, खा. संजय काका पाटील, खा. कृपाल तुमाने, खा. सुनिल मेंढे, खा. श्रीमती भावना गवळी, खा.सय्यद इम्तियाज जलील, खा.हेमंत गोडसे, खा.राजेंद्र गावित, खा.र्धर्यशील माने, खा.गोपाल शेट्टी, खा.मनोज कोटक, खा.श्रीरंग आप्पा बारणे, खा.सदाशिव लोखंडे, खा.सुधाकर श्रृंगारे, खा.संजय मंडलीक यांच्यासह २३ खासदारांची उपस्थिती होती.

                    नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात बुधवारी (दि.२०) रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन बैठकीस सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी खासदार हेमंत पाटील यांनी बैठकीस उपस्थित खासदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गावा-गावात मोठ्या प्रमाणात मराठा समजाच्या आरक्षणासाठी उपोषणे सुरु आहेत. अनेक तरुण मुले उपोषण करत आहेत. या संदर्भात तातडीने दखल घेऊन न्यायालयीन लढाईत टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी सर्व खासदारांनी मराठा समाजाच्या आऱक्षणा संदर्भासाठी लागणारी कागदपत्रे, पुरावे देण्यासंदर्भात मदत करावी असे या बैठकीत ठरले आहे. 

मराठा समाजा सोबतच महाराष्ट्रात कुणबी, धनगर, ओबीसी व इतर समाजात देखील आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने आणि उपोषण सुरु आहेत. या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखल्याने मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उप मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजास आरक्षण दिले जावे. मराठा समाजास आरक्षण देतांना इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक सलोखा कायम राखून  आरक्षण द्यावे या करीता देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांची वेळ घेऊन त्यांची भेट घेऊन आरक्षणाची मागणी करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. उपस्थित सर्व सहकारी खासदारांचे खासदार हेमंत पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News