भारतीय संविधान गौरव दिनाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची १४ नोव्हेंबर रोजी बैठक - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, November 13, 2023

भारतीय संविधान गौरव दिनाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची १४ नोव्हेंबर रोजी बैठक

 नांदेड : भारतीय संविधान गौरव दिनाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्यावतिने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यादृष्टीने पूर्वतयारी नियोजनासाठी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता संविधान अकॅडमी,जैन मंदिराजवळ, तरोडा (खु) नांदेड येथे एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

       भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त यंदा महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.त्याच अनुषंगाने पूर्वतयारी व नियोजनासाठी दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता 'संविधान अकॅडमी',जैनमंदिर जवळ,तरोडा (खु.),नांदेड येथे एक महत्त्वपूर्ण व तातडीची बैठक आयोजित करण्यात आलेली असून  महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला  बहुसंख्येने उपस्थिती नोंदवावी असे आवाहन काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.गंगाधर सोनकांबळे,काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य मनोहर पवार,राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव मा.भवरे, अमितकुमार कांबळे,युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक बळवंत तेलंग आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News