गोकुंदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित “विकसीत भारत संकल्प यात्रे”च्या शुभारंभ कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. गोकुंदा येथील सरपंच अनुसया संजय सिडाम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी एस. कार्तिकेयन एस., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, सुधाकर भोयर व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पालकमंत्री श्री महाजन असे म्हणाले की, आजवर जे वंचित घटक विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत, अशा दुर्गम आदिवासी भागातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर आपण भर देत आहोत. प्रत्येक व्यक्तींच्या गरजेनुसार ज्या योजना त्यांना योग्य असतील अशा योजना साकारलेल्या आहेत. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत, स्वयंरोजगारापासून कृषी पर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी आहे. शासकीय योजनाप्रती सकारात्मकता ठेऊन त्या-त्या योजनांचा लाभ घेतल्यास भारताला विकसीत देशाच्या क्रमवारीत येण्याला वेळ लागणार नाही.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून “विकसीत भारत संकल्प यात्रा” होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी कटिबद्ध होऊन काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपण देवू शकलो, असेही ते म्हणाले. प्रत्येक पाड्या- गुड्यांवर आदिवासी वस्तींवर शुद्ध नळाचे पाणी पोहोचले पाहिजे यासाठी “हर घर नल से जल” ही योजना त्यांच्याच दूरदृष्टीतून साकारली. आदिवासी समाज हा निसर्गाशी एकनिष्ठ राहणारा समाज आहे. शहरीभागत आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. परंतु आपण दूरदर्शनवर काही बातम्या पाहतो. आजही काही आजारी व्यक्ती किंवा गरोदर महिला यांना झोळी करून पाच ते दहा किलोमीटर आरोग्य सेवेसाठी न्यावं लागत. हे सगळं बदलण्याचा प्रयत्न म्हणून व पर्याप्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही विकसीत भारत संकल्प यात्रा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 50 लाखांपेक्षा अधिक आदिवासींना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुमारे 1 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक कुटुंबियांना शासन शौचालय देवू शकले. शासकीय योजनांद्वारे झालेले हे मोठे परिवर्तन आहे, असेही पालकमंत्री गिरीश महाजन आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी आमदार भीमराव केराम आपल्या मनोगतात म्हणाल की, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी भगवान बिरसामुंडा यांच्या जयंती जनजाती दिवस निमित्त आदिवासींना सामाजिक न्याय मिळण्याच्या उद्देशाने आपल्या संकल्पनेतील " विकसित भारत संकल्प यात्रा " सुरु केली आहे. या प्रारंभा निमित्त पालकमंत्री गिरीशजी महाजन माझ्या आदिवासी मतदार संघात आलेत. त्यामुळे माझ्या परिसराच्या विकासासाठी केंद्रा प्रमाणेच राज्य शासनही भरभरून देईल याची आम्हास खात्री आहे.
या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज घडसिंग, तालुका आरोग्य अधिकारी किशन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर शिंदे , उत्तम कानिंदे , संदीप यशीमोड आदिंसह विविध कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment