बारामती : व्हॉईस ऑफ मीडिया ही देशातील सर्वाधिक पत्रकार असेलली संघटना असून या संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर पत्रकार अधिवेशन दि. १८ व १९ नोव्हें २०२३ रोजी गदिमा सभागृह , बारामती (जि. पुणे) येथे संपन्न होत आहे.
या नावीन्यपूर्ण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून हिगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील , विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार , ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर , सुनेत्राताई पवार, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, माजी आमदार रामराव उपस्थित होते .
याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे , प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के , संयोजक अजित कुंकूलोळ , व्हॉईस ऑफ मीडिया बारामती अध्यक्ष जितेंद्र जाधव, सकाळ समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र पिसाळ, सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, किरण गुजर, सचिन सातव, हनुमंत पाटील यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले पत्रकार बांधव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment