मोसम मस्ताना ; अजिबात गरज नसतांना - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, November 28, 2023

मोसम मस्ताना ; अजिबात गरज नसतांना

 

छायाचित्र आमचे वाचक जितेंद्र महाजन यांनी पाठवले आहे.


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : माणसाचे रंग, रूप कधी बदलेल हे कोणालाच सांगता येत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा व स्वार्थासाठी आपले रुप बदलणारी माणसे आपण सर्वांनीच पाहिली असतील. पण आजची रविवारची सकाळ मात्र जरा वेगळीच निघाली. मुंबईत सकाळीच धो-धो मुसळधार पावसाने मुंबईकरांची झोप उडाली. नियमित पडणाऱ्या पावसाळ्यातील पावसापेक्षा ईथे जोरदार पाऊस सुरू झाला.

     मुंबईतील  कांदिवली मध्ये राहणारे प्रकाश पांचाळ यांच्या मते ग्लोबलायझेशन मुळे येणारे हे नवीन संकट आहे अशी भावना व्यक्त केली. नोव्हेंबर महिन्यातील या पावसामुळे सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे. मुंबईतील उपनगरातील एका शिक्षक वसाहतीत एक फार मोठा साप वसाहतीत शिरल्यामुळे शिक्षकांची पाचावर धारण बसली.शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितले असता त्यांनी मानवतावादी दृष्टीने सर्प हा शेतकर्‍यांचा मित्र असल्याचे सांगून सर्प मित्राला बोलावून सापाची रवानगी वसाहती पासून दूर झुडपात करण्यात आली. 

मुंबईसह अनेक जिल्ह्यातील भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याची बातमी आहे. 

आँक्टोंबर हिटमुळे वातावरणात थोड्याफार प्रमाणात थंडावा निर्माण झाला आहे. डिसेंबर महिन्यातील थंडीला अद्याप वेळ असला तरी या पावसामुळे वातावरण आल्हाददायक बनले आहे 

रस्त्यावर पाणी पडल्याने दुचाकी वाहने चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे असे मत प्राध्यापक धर्मेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले आहे. 

मध्यंतरी दिल्ली प्रमाणेच मुंबईतील प्रदुषणाचे प्रमाण भयंकरच वाढले होते व कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याचा मनोदय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता त्यावर पाणी फिरले अशी मिश्कील प्रतिक्रिया उबाठा शिवसेनेचे उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. 

महाराष्ट्रातील अनेक जिल्हातील भागात हवामान खात्याने येलो अर्लट दिला आहे. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती नाशिक मधील शेतकर्‍यांनी दिली. कांद्याच्या प्रमाणेच मका व द्राक्ष पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी मात्र या पावसामुळे चिंतीत झाला आहे. रविवार असल्याने प्रवासी वाहतूकीवर या  पावसामुळे फारसा परिणाम झाला नाही. निसर्गाच्या या बदलामुळे पावसाच्या मिम्सचा मात्र पाऊस पडत आहे.

सरकार व पाऊस कधीही कोसळू शकतो असे विधान महाराष्ट्र नव निर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News