मुंबई : शिक्षण प्रसारक मंडळ, मुलुंड व बॉम्बे प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलुंड विद्या मंदिर युवा विभागाच्या वतीने सामाजिक जागृती अभियान 2023 अंतर्गत थँक्यू मुंबई पोलीस कार्यक्रम शालेय सभागृहात आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमात 26/ 11 च्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून कर्तव्यदक्ष पोलिसांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शहिदांना विनम्र अभिवादन करून पोलीस अभिमान गीत व नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले.मी मुंबई पोलीस बोलतोय या शीर्षकाखाली शुभ संदेश व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 26/ 11 च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमाला मुलुंड पश्चिम पोलीस ठाण्याचे पी.आय. श्री गावडे साहेब व सर्व पोलीस अधिकारी हे संपूर्ण पोलीस टीम सह उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री शशांक म्हात्रे साहेब यांनी भूषविले कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन व सूत्रसंचालन श्री संदीप माने सर यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक व शिक्षक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment