राज ठाकरे यांनी केले वडापाव महोत्सवाचे उद्घाटन ; राजकीय फटकेबाजी केली नाही तर नवलच! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 3, 2023

राज ठाकरे यांनी केले वडापाव महोत्सवाचे उद्घाटन ; राजकीय फटकेबाजी केली नाही तर नवलच!

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आपल्या देशातील खाद्यसंस्कृती ही एक वैशिष्ट्य पुर्ण आहे. महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत. असाच एक महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. गोरेगाव येथील एका वडापाव महोत्सवाला राज्यातील एक दिग्गज नेते अर्थातच राज ठाकरे या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती होते. दादरचा राज ठाकरे अर्थातच त्यांची किर्ति सर्वांनाच परीचित. वडापाव महोत्सवाला त्यांनी राजकीय फटकेबाजी केली नाही तर नवलच! 

     मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वडापाव  महोत्सवाच्या  कार्यक्रमात राज्य सरकारवर मिश्किल टिप्पणी केली. हा वडापाव पाहिला की मला राज्य सरकारची आठवण येते, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला वडापावची उपमा दिली. देवेंद्र फडणवीस  आणि एकनाथ शिंदे  यांच्यामधला वडा अजित पवार आहे, की अजित पवार  आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वडा हा एकनाथ शिंदे आहे की त्या दोघांमधला वडा देवेंद्र फडणवीस आहेत, हेच कळत नाही. गोरेगावात वडापाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी या मंचावरुन वडापावचं भरभरुन कौतुक देखील केलं. 

    मुंबईचा वडापाव सातासमुद्रापार गेल्याचेही राज ठाकरेंनी सांगितले. माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मात्र इच्छा असुनही मला वडापाव खाता येत नाही अशी मिश्कील टिप्पणीही राज ठाकरेंनी केली. स्वतः डाएट बद्दल जागृत असलेले फिल्मी कलाकार मात्र अशा खाद्य संस्कृतींच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थीत असतात. महाराष्ट्रात वडापावची चव घेतली नाही असा माणूस विरळाच ! अशी प्रतिक्रिया जितेंद्र महाजन यांनी दिली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News