नांदेड,ता. 14 : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांची शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या लोकजागर या सत्रात सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी मुलाखत प्रसारित होणार आहे.
राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोदी आवास घरकुल योजनेविषयी त्यांनी आकाशवाणीला मुलाखत दिली असुन मिलिंद व्यवहारे यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखती मधून डॉ. संजय तुबाकले यांनी मोदी आवास घरकुल योजनेचे निकष, योजनेचे स्वरूप, लाभार्थी पात्रता, अर्थसहाय्य पद्धती, आदी विषयी माहिती दिली आहे. तरी श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी तथा कार्यालय प्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment