सीईओ मीनल करनवाल यांनी वारंवार आढावा घेत समन्वय साधत वाढवलेल्या गतीने जल जीवन मिशन कामात नेला जिल्हा आघाडीवर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 14, 2023

सीईओ मीनल करनवाल यांनी वारंवार आढावा घेत समन्वय साधत वाढवलेल्या गतीने जल जीवन मिशन कामात नेला जिल्हा आघाडीवर



नांदेड, ता.14 : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी  जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात एकूण  1234  इतक्या नळ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. जल जीवन मिशनची कामे गुणवत्तापूर्ण व जलद गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल वेळोवेळी सदरील कामांचा वारंवार आढावा घेऊन सर्व यंत्रणांबरोबर समन्वय साधत कामांची गती व गुणवत्ता दोन्ही बाबतीत जिल्हा आज रोजी आघाडीवर नेलेला आहे. 

    या कामी  प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले कार्यकारी अभियंता  अमोल पाटील ह्या दोघांच्या  मार्गदर्शनामुळे आज रोजी जिल्ह्यातील एकूण 231 इतक्या गावांचे हर घर जल सर्टिफिकेशन पूर्ण झालेले आहे. सर्व गट विकास अधिकारी,  उप अभियता,  कंपनीचे अकोलवार व जिल्हा परिषतेचे सर्व शाखा अभियंता, कंपनीचे सर्व अभियंते हे रात्रंदिवस काम करून जलजीवन मिशनची कामे जलद गतीने पूर्ण करण्याकरिता प्रचंड मेहनत घेत आहेत. 

     अनेक ठिकाणी असलेल्या जागेच्या उपलब्धतेच्या अडचणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनेक वेळा बैठका घेऊन, संपर्क अधिकारी नेमून, सर्व गट विकास अधिकारी व सर्व उपाभियंता यांचेशी योग्य समन्वय ठेवून निकाली काढली आहेत. टाटा कन्सल्टन्सी या थर्ड पार्टी इन्स्पेक्शन टीमने वेळोवेळी कामांना भेटी देऊन कामे कटाक्षाने गुणवत्ता पूर्ण करून घेत आहेत. वेळप्रसंगी कंत्राटदारांची कटूता घेऊन त्रुटी असल्यास त्या तात्काळ दूर करूनच रिपोर्ट देत असल्यामुळे सर्व कामे चांगल्या दर्जाची होत आहेत. वेगवेगळ्या यंत्रणा, अभियंते  कामांना भेटी देऊन वेळोवेळी व्हाट्सअप ग्रुप वर कामाचे फोटो टाकतात. गुणवत्ता खराब असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक तसेच कार्यकारी अभियंता लगेच सूचना करून त्रुटी दूर करून कामे चांगल्या दर्जाची करून घेत आहेत. सध्या जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांना गती आली असून सर्वांचे लक्ष मार्च 2024  पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे लक्ष आहे.


 

गुरुवारी (ता. 13 डिसेंबर ) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल  यांनी मुदखेड तालुक्यातील मौजे बारड,  तिरकसवाडी, डोंगरगाव, वैजापूर तसेच अर्धापूर तालुक्यातील बामणी येथील जलजीवन मिशन अंतर्गत प्रगती प्रथावर असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News