डॉ.अंकुश देवसरकर यांच्या उपस्थितीत व राहूल सर्पे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 21, 2023

डॉ.अंकुश देवसरकर यांच्या उपस्थितीत व राहूल सर्पे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

 


 किनवट : हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छूक उमेदवार काँग्रेस पक्षाचे झुंजार नेते तथा रुग्णसेवा देणारे डॉ. अंकुश देवसरकर हे नुकतेच किनवट संपर्क दौर्‍यावर आले होते. त्या निमित्ताचे औचित्य साधून युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हा सचिव राहूल सर्पे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

     येथील कलावती गार्डन येथे आयोजीत पक्ष प्रवेश कार्यक्रमात युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हा सचिव राहूल सर्पे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

      हिंगोली लोकसभा मतदार संघातील इच्छूक उमेदवार काँग्रेस पक्षाचे झुंजार नेते तथा रुग्णसेवा देणारे डॉ. अंकुश देवसरकर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, येथील जनतेला काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. सत्ताधारी पक्ष हा जनतेची दिशाभूल करून त्यांना फसवित आहे. या सत्ताधारी पक्षामुळे देशात उपासमारी, बेरोजगारी, गरीबी सातत्याने वाढत आहे. काँग्रेस पक्ष जर सत्तेत असता तर असे काही घडले नसते. किनवट तालुक्यात काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी येत असल्याचे दिसून येत आहे. 

     राहूल सर्पे हे उगवते युवा नेतृत्व असून त्यांनी किनवट तालुक्यात आपली चांगली छाप सोडली आहे. त्यांच्या नेतृत्वावर अनेकांनी विश्‍वास ठेवून कामाला सुरूवात केली आहे. येणार्‍या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे भवितव्य अधिक उज्वल असेल अशा प्रतिक्रीया राहूल सर्पे यांनी यावेळी दिल्या. 



     यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष के.सूर्यकांत रेड्डी, व्यंकटराव नेम्माणीवार, माजी नगरसेवक अभय महाजन, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, गिरीष नेम्माणीवार, के.मुर्ती, जव्वाद आलम, काँग्रेस सरचिटणीस बाभळीकर, सुभाषबाबू नायक, शेख जाफर भाई चिखलीकर, काँग्रेस सेवादलाचे तालुका अध्यक्ष शरद कोत्तापेल्लीवार, ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष फारुख चव्हाण, शेख शादुल्ला भााई, नवीन जाधव, वसंत राठोड, सत्तार खिच्ची, प्रिती मुनेश्‍वर, जयश्री भरणे, परवीन शेख, सुरेखा घाटकर, माधवखेडकर, अनिल कांबळे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News