बहुजन चळवळीत योगदान देणाऱ्या निष्ठावंत व समर्पित कार्यकर्त्यांचा 6 रोजी सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, January 5, 2024

बहुजन चळवळीत योगदान देणाऱ्या निष्ठावंत व समर्पित कार्यकर्त्यांचा 6 रोजी सत्कार

 


नांदेड : बहुजन समाज बामसेफ संयोजक महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा मराठवाडा झोन प्रभारी मनीषभाऊ कावळे यांच्या जन्मदिनानिमित्त ता. 6 जानेवारी 2024 रोजी  फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे कार्य करून, बहुजन चळवळीत योगदान देणाऱ्या निष्ठावंत व समर्पित कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन बसपा मराठवाडा-नांदेड झोन कार्यालय सचिव नारायण घुले यांनी केले आहे.

     येथील गणेशनगर रोड वरील वाय पॉईट जवळील बीएसपी भवन येथे शनिवारी (ता.6 जानेवारी) सायंकाळी ठीक 6.30 वा. होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षते स्थानी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड. परमेश्वर गोणारे राहणार असून प्रदेश सचिव दिगंबर ढोले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार  आहे.

    या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्हा युनिटचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे, जिल्हा प्रभारी सुनीलभाऊ डोंगरे, सटवाजी सोनकांबळे, जिल्हा संघटनमंत्री सखाराम इंगोले,  नांदेड महानगराध्यक्ष, बळीराम निखाते,  नांदेड शहराध्यक्ष, लक्ष्मण वायवळ, जिल्हा महासचिव साहेबराव थोरात, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल कोठेवाड, जिल्हा सचिव अर्जुन नरवाडे, जिल्हा कोषाध्यक्ष  भीमराव भाटापुरकर,  जिल्हा  बामसेफ संयोजक सुरेश जोंधळे आदि कार्यकर्त्यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News