किनवट : जेतवन बुद्धविहार सिद्धार्थनगर मागील साठेनगर येथील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक तथा उमरी (बाजार) येथील मूळ रहिवाशी यादवराव उकंडाजी मुनेश्वर ( वय 83 वर्षे ) यांचे वृध्दापकाळाने बुधवारी (ता.17 जानेवारी 2024) दुपारी एक वाजताच्या सुमारास राहत्याघरी निधन झाले.
गुरुवारी (ता.18 जानेवारी) सकाळी 11 वाजता साठेनगर येथील त्यांच्या निवास्थानापासून त्यांची प्रेतयात्रा निघणार असून बसस्थानकाजवळील माहूर रोडवरील 'शांतीभूमी स्मशानभूमीत ' त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पश्चात पत्नी, विवाहीत तीन मुली, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार असून ते उमरी (बा) येथील सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक मुनेश्वर यांचे थोरले बंधू, बातमीदार ऍड. मिलिंद सर्पे यांचे सासरे व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांचे वडील होत.




No comments:
Post a Comment