भविष्यवेधी शिक्षण आवाहनास 2531 शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 31, 2024

भविष्यवेधी शिक्षण आवाहनास 2531 शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


नांदेड :जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाचा नाविन्यपूर्ण उपक्रम असलेल्या भविष्यवेधी शिक्षण या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दि. 3 फेब्रुवारी रोजी शिक्षण परिषदेत सर्व शिक्षकांना त्यांचा वर्ग दिनांक ३१ मार्च पर्यंत मूलभूत कौशल्य प्राप्त असलेला वर्ग असेल असे आव्हान दिलं होते. जे शिक्षक शाळेतील किमान एखादा वर्ग 100 टक्के असर मूल्यमापनाच्या मानकाचे करतील त्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल असे प्रतिपादन केले होते. या अनुषंगाने शिक्षकांनी 2531 प्रतिसाद दिले असून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत या प्रतिसादांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.                                   भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण घेऊन उत्कृष्ट पद्धतीने जिल्ह्यात उपक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या 825 शिक्षकांची शिक्षण परिषद शंकरराव चव्हाण सभागृह घेण्यात आली होती.या परिषदेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी शिक्षकांना आवाहन करून जे शिक्षक मुख्याध्यापक एखादा वर्ग किंवा शाळा 100% असर मूल्यमापनाचा करतील 1 मे पर्यंत संपूर्ण शाळा असर मूल्यमापनाची करतील आणि दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत संपूर्ण शाळा न्यास च्या गुणवत्तेची करतील अशा शिक्षक शाळांचा विशेष गौरव केल्या जाईल असे आश्वासित केले होते. शिक्षकांनी यास उत्तम प्रतिसाद देऊन आतापर्यंत 2531 अभिप्राय लिंकद्वारे नोंदविण्यात आले आहेत. ही या उपक्रमाची सकारात्मक बाब असून शिक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक करून  येत्या 15 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण शाळा न्यास च्या मानकाच्या करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News