हदगाव (नांदेड ) : निष्काम वृत्तीने आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यासाठी झटणाऱ्या शिक्षक - शिक्षिकांच्या आयुष्याचेही कल्याणच होते. शिक्षक समाजाचे लेकरं घडविताना स्वतःच्या लेकरांचाही उत्कर्ष होत असल्यामुळे शिक्षकांचे खाजगी आयुष्यही कृतार्थ होते. असे प्रतिपादन हदगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी किशन फोले यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाभरा केंद्र निमगाव शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक बळीराम कदम यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत चाभराचे सरपंच सदाशिव पाटील चाभरकर, उपसरपंच अमोल बोले, ग्रामपंचायत सदस्य नारायण संगेवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन बोले, उपाध्यक्ष आनंद मगर, निमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत देशपांडे, केंद्रिय मुख्याध्यापक गं.ई.कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस पत्रकार सुभाष लोणे लहानकर, महाराष्ट्र राज्य पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभाग मंत्रालय, मुंबईचे नागपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद लोणे लहानकर, इंजि.सूर्यकांत सावरगावे, सेवानिवृत्त प्राचार्य देवराव कदम, प्रा.धाबे, सत्कारमुर्ती बळीराम कदम, रत्नमाला बळीराम कदम, नांदेड पतसंस्थेचे संचालक माणिक कदम, इब्टाचे हदगाव तालुका सरचिटणीस नारायण पाईकराव, संजय वाकोडे, निमगाव केंद्रांतर्गत मुख्याध्यापक बालाजी पेंटलवार, राजाराम राठोड, मा.सचिन काळे, भाऊराव भिसे, किशनराव कल्याणकर, शिवशंकर धुतराज, अहमद शेख, मनोहर जाधव, बाबासाहेब सोनाळे, दिलीप नरवाडे, श्रीकांत मांडवकर, हरिहर मरशिवणे, अर्चना संगम, संगिता हळदे, अंजली चिखले, जी.पी.सूर्यवंशी, नागेश क्यातमवार यांची प्रमुख उपास्थिती होती.
याप्रसंगी निमगाव केंद्राच्या वतीने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाभरा शाळेच्या वतीने कपडेरूपी पूर्ण सुट, आहेर व भेटवस्तू देवून बळीराम कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी रत्नमाला बळीराम कदम यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यालय चाभरा आणि शालेय व्यवस्थापन समिती चाभराच्यावतीनेही पूर्ण कपडेरुपी आहेर देवून सन्मान करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्यावतीनेही बळीराम कदम यांना अनेक भेटवस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचं औचित्य साधून निमगाव केंद्रात नव्याने रुजू झालेले केंद्रप्रमुख चंद्रकांत देशपांडे, पदोन्नत मुअ बालाजी पेंटलवार, शिक्षक नंदकुमार चेड्डू, सविता साळुंके, मारोती थोटे, हरिहर मरशिवणे, बालभारतीवर निवड झालेले नागेश क्यातमवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तंबाकूमुक्त शालेय स्पर्धेत यशवंत ठरलेल्या प्रा.शा. चोरंबाच्या तीन विद्यार्थ्यांचा सन्मान गशिअ यांच्या हस्ते करण्यात आला.
सेवापूर्ती सोहळ्याच्या अनुषंगाने सुनील कंठाळे, जी.पी.सूर्यवंशी, माणिक कदम, रंजिता भिसे, केंद्रीय मुख्याध्यापक गं.इ.कांबळे , केंद्रप्रमुख चंद्रकांत देशपांडे, सेवानिवृत्त प्राचार्य देवराव कदम, पत्रकार सुभाष लोणे लहानकर , उप विभागीय अधिकारी प्रमोद लोणे यांची समयोचित भाषणे झाली.
बळीराम कदम यांनी सत्काराला भावविवष होवून उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाभरा केंद्र निमगावचे मुख्याध्यापक बालासाहेब लोणे यांनी केले. इयत्ता ६ वी व ७ वी विद्यार्थीनीनी स्वागतगित गायले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बालासाहेब लोणे, सुनील कंठाळे, विनायक मुलंगे, अशोक फुलवळकर, पांडुरंग चव्हाण, राजेश चिटकुलवार, प्रतिभा बस्सापूरे, विजया पिन्नलवार, रंजिता भिसे, विठ्ठलअप्पा बिच्चेवार, शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment