नांदेड, ता. ३ एप्रिल, : नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती नोडल अधिकारी मिनल करनवाल यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवारी (ता. ४ एप्रिल) सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्त्व, जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणारी तयारी, जनजागृती उपक्रम आदी विषयी त्यांनी या मुलाखतीतून माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment