उमेद स्वयंसहाय्यता समूहातील दोन लाख महिलांनी साईओ मिनल करनवाल यांच्या समक्ष घेतली मतदान करण्याची शपथ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, April 3, 2024

उमेद स्वयंसहाय्यता समूहातील दोन लाख महिलांनी साईओ मिनल करनवाल यांच्या समक्ष घेतली मतदान करण्याची शपथ

 


नांदेड : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नांदेड अंतर्गत सह्याद्री आदर्श प्रभाग संघ वडेपुरी येथील सर्व ग्राम संघातील महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व नोडल प्रमुख श्रीमती मीनल करणवाल यांच्या उपस्थितीमध्ये 100% मतदान करण्याची शपथ घेतली.  

     यावेळी   पंचायत समिती लोहाचे गट विकास अधिकारी आडेराघो, जिल्हा अभियान व्यवस्थापक  गजानन पातेवार, SVEEP प्रमुख तथा लोहाचे गट शिक्षणाधिकारी एन.एम. वाघमारे,  श्रीमती अंबलवाड उपस्थित होते.

        नांदेड जिल्ह्यात मागच्या वेळेस 65 टक्के मतांचा टक्का होता तो आता 100% पर्यंत नेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  यांच्या मार्गदर्शनाखाली  नोडल प्रमुख तथा जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल  यांनी आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी आज दोन लाख पेक्षा अधिक महिलांनी प्रत्येक गावात शंभर टक्के मतदान करण्याची  शपथ घेतली. 

     यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील जिल्हा व्यवस्थापक उपजीविका बालाप्रसाद जंगीलवाड ,  जिल्हा व्यवस्थापक एम आय एस गणेश कवडेवार, जिल्हा कौशल्य समन्वयक अतिश गायकवाड , लेखापाल हनमंत कंदुरके  तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष येथील तालुका अभियान व्यवस्थापक कांता ताटे , तालुका व्यवस्थापक क्षमता बांधणी व संस्था बांधणी मल्लेश एडके , तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन संजय सातपुते , सह्याद्री वडेपुरी प्रभागसंघाचे प्रभाग समन्वयक रवींद्र मोरताटे, प्रभाग समन्वयक निलेश जोंधळे तसेच सह्याद्री आदर्श प्रभागसंघ वडेपुरी येथील अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष , लिपिका , प्रेरिका तसेच प्रभाग संघांअंतर्गत येणारे सर्व गावातील प्रेरिका आयसीआरपी आणि वडेपुरी गावातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी आज शपथ घेतली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News