*श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती!* *निजामने केली पुनमची निघृण हत्या!* *#पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या संरक्षणाचे दिले महत्वपूर्ण निर्देश* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 30, 2024

*श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती!* *निजामने केली पुनमची निघृण हत्या!* *#पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या संरक्षणाचे दिले महत्वपूर्ण निर्देश*




मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम नामक टॅक्सी ड्रायव्हर तिला १८ एप्रिलला पळवून घेऊन गेला आणि कल्याणमध्ये तिची हत्या केली. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. स्थानिकांमध्ये या घटनेविरुद्ध आक्रोश असून त्यासंदर्भात स्थानिकांनी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली. सदर प्रकार कानावर येताच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मानखुर्द येथे जाऊन पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पूनमचा दुर्दैवी मृत्यू ही श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनवरावृत्ती असून अतिशय दुःखद घटना आहे. प्रकरणातील आरोपी निजाम याला अटक झाली असली तरी त्याचे साथीदार अजून फरार आहेत. 


"मातंग समाजातील बहिणींना फसवलं जातंय, आमच्या भगिनींची कट्टरपंथीयांकडून निघृण हत्या केली जातेय, हे अतिशय क्लेशदायक आहे. मालवणी, चेंबूर, अंधेरीनंतर आता आपल्या शहरातील ही चौथी घटना आहे, त्यामुळे पोलिसांना याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही! या समाजकंटकांच्या विरोधात लढा देण्यासाठी सकल हिंदू समाज एकत्र झाला असून, सरकार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करेल. तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांग्लादेशींचा बंदोबस्त करावा लागेल!" असे पालकमंत्री लोढा यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.  


*महिलांच्या सुरक्षेसाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तीन महत्वपूर्ण निर्देश पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जागीच दिले आहेत.*


१. बांग्लादेशी, रोहिंग्यांच्या वाढत्या घुसखोरीमुळे असे प्रकार अधिक वाढीस लागले आहेत. मानखुर्दमध्ये असलेल्या सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकाम तोडून सरकारी जमीन मोकळी करा. 


२. बांग्लादेशी, रोहिंग्यांसाठी विशेष शोध मोहीम राबवा 


३. जोपर्यंत आरोपीचे सहकारी पकडले जात नाहीत, तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News