*प्रकाश लक्ष्मणराव पाटील यांचे निधन ; शनिवारी (ता. 25 ) दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, May 25, 2024

*प्रकाश लक्ष्मणराव पाटील यांचे निधन ; शनिवारी (ता. 25 ) दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार*किनवट : येथील सिद्धार्थनगरातील जेतवन बुद्ध विहारा जवळील रहिवाशी , सामाजिक कार्यकर्ते , आंबा, केळीचे व्यापारी प्रकाश लक्ष्मणराव पाटील (वय 58 वर्षे ) यांचे शनिवारी (ता. 25 मे 2024) सकाळी 8 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

        ते अत्यंत प्रेमळ व सुस्वभावी होते. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ते सर्वदूर परिचीत होते. महापुरुषांच्या जयंती अथवा इतर सार्वजनिक कार्यक्रमात ते स्वतः भोजन व्यवस्था सांभाळायचे.

     त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, जावई , भाऊ , नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचा प्रेतयात्रा आज शनिवारी (ता. 25 मे 2024) दुपारी  4.30 वाजता साठेनगर येथील बस आगाराजवळील (जुने राजाराम हॉटेल )  त्यांच्या निवास स्थानापासून निघणार असून किनवट-माहूर महामार्गावरील बसस्थानका जवळील शांतीभूमी स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News