नांदेडच्या दुसऱ्या बौध्द विवाह मेळाव्यात 27 जोडपे विवाहबध्द : आमदार बालाजी कल्याणकर यांच्या तर्फे नवदाम्पत्यांचा सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 25, 2024

नांदेडच्या दुसऱ्या बौध्द विवाह मेळाव्यात 27 जोडपे विवाहबध्द : आमदार बालाजी कल्याणकर यांच्या तर्फे नवदाम्पत्यांचा सत्कार

 


नांदेड : येथील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात वैशाख  पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसी शुक्रवारी (ता. 24 मे 2024 )  दुसऱ्या बौध्द विवाह मेळाव्यात 27 जोडपे विवाह बध्द झाले. प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्थेच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

     गुरुद्वारा लंगर साहिबचे जत्थेदार नांदेडभूषण संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या वतीने दारक दरिकांना शुभ आशीर्वाद देण्यात आले. भदन्त पय्याबोधी थेरो, धर्मगुरू मेथडिस्ट चर्च रेव्ह. सॅम्युएल एस. दामले, मौलाना रुसूल हसमी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक बौध्द विवाह मेळाव्याचे उद्घाटन झाले. 

        प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विवाह सोहळ्यास आमदार बालाजी कल्याणकर, नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, मनिष कावळे, माजी सभापती बंडू पावडे, देविदास सरोदे, धम्मा कदम, डॉ. गंगाधर सोनकांबळे, माधवराव जमदाडे, छ. सभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोकराव येरेकार , यशवंतराव उबारे, लक्ष्मण गावडे , ऍड. रंधिर तेलगोटे, महेंद्र कावळे, प्रकाश गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. 

      यावेळी नांदेड उत्तरचे  आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते नवदांपत्याचा सत्कार करण्यात आला. बौध्द विवाह मेळावा समितीचे अध्यक्ष इंजि. भरतकुमार कानिंदे यांनी प्रास्ताविकातून विवाह सोहळ्याची भूमिका मांडली. प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याचे आ. कल्याणकर यांनी तोंडभरुन कौतुक केले. असे उपक्रम ही काळाची गरज असून मोठ्या स्वरुपात सामुहिक विवाह झाले पाहिजे असेही आ. कल्याणकर म्हणाले. सुंदर नियोजन आणि छान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जवळपास १५ हजार समाजबांधव या सोहळ्याला उपस्थित होते. 

              या  विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी  समितीचे अध्यक्ष इंजि. भरतकुमार कानिंदे, संयोजक  सुनिल भरणे, उपाध्यक्ष संघरत्न सोनसळे, सचिव हिरामण भगत, कोषाध्यक्ष कोंडीबा वासाटे, सहसचिव, अंजली मुनेश्वर, भीमराव धनजकर, सुखदेव येरेकर, अभि. अनिल आठवले, इंजि. प्रकाश नगारे, प्रेमदास घुले, इंजि. नागनाथ पाटील, मनोरमाताई कावळे, प्रवीण पुंडलिक भगत, वसंत वीर, देविदास भिसे, अरविंद घुले, राहुल मुनेश्वर, प्रा.साहेबराव इंगोले, मधुकर उमरे, डी.पी. गायकवाड, साहेबराव पुंडगे, रवि चिखलीकर, भास्कर भगत, वैशाली सोनसळे, डॉ. प्रवीण घुले, नारायणराव इंगोले, दिपक बनसोडे , गुणवंत भगत, विजय पोपलवार, प्रेमदास घुले, रावळे पोलीस पाटील, लक्ष्मण मुनेश्वर. दीक्षाताई नंदन नांगरे, निर्मला आनंदराव नरवाडे, मीना भगवान लांडगे, वंदना देवानंद भगत, सत्वशीला थोरात, जयश्री भगत, कुसुम धोटे , पुष्पा भरणे, रमाबाई पाटील यांनी परिश्रम घेतले.


छत्रपती संभाजीनगर येथील धम्म चळवळीतील दान पारमितेला वाहून घेतलेल्या उपासिका आशाताई अशोकराव यरेकर यांच्या वतीने दारक दारिकेस वस्त्ररूपी भेट, चांदीची दागिने तसेच सामाजिक कार्यकर्त्या संगीता संजय सवई यांनी 23 पूज्य भदंत यांना चिवरदान व प्रत्येक नवदाम्पत्यास स्वयंपाकाचे कुकर भेट दिले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News