*पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये : जिल्हाधिकारी* *चला सेतू केंद्रावर;एक रुपयात पिक विमा योजना ; 15 जुलै शेवटची तारीख* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 4, 2024

*पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये : जिल्हाधिकारी* *चला सेतू केंद्रावर;एक रुपयात पिक विमा योजना ; 15 जुलै शेवटची तारीख*




 नांदेड, ता. 4 :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 पिक विमा पोर्टल चालू झालेले असून 15 जुलै 2024 पर्यत अंतिम मुदत आहे. तरी शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरुन घ्यावा. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा/ पुनर्गठन करुन शासनाच्या एक रुपये पिक विमा योजनेत अधिक सक्रीय सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.


पिक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्रचालकांनी सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता  भरुन घ्यावा. तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचे नावामधील दुरुस्ती करुन घेणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णत: बदल असेल तर, अशा शेतकऱ्यांचा विमा भरुन घेऊ नये, कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावरच जमा होणार आहे. त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील, आधारकार्डवरील सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे.


तरी सर्व ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरीत भरून घेवून शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांचे नावात दुरुस्ती करुन घ्यावी. यासाठी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे असे कृषि विभागाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News