किनवट : येथील कॉस्मॉपॉलीट शिक्षण संस्थेचे माजी ट्रस्टी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा डॉ. आंबेडकरनगर, गोकुंदा येथील ज्येष्ठ नागरिक देवराव जोगाजीराव नरवाडे उपाख्य डी.जे. नरवाडे (वय 71 वर्षे) यांचे शुक्रवारी (ता.05 जुलै ) दुपारी 02.00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या डॉ. आंबेडकरनगर , गोकुंदा येथून त्यांच्या पार्थिवाची प्रेतयात्रा शनिवारी (ता.06 जुलै ) सकाळी 09.00 वाजता निघणार असून त्यानंतर गोकुंदा येथील एरिगेशन कॉलनी जवळील पैनगंगातिरावरील स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सूना , जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार असून जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मोहपूर येथील विषय शिक्षक सचिन नरवाडे यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment