किनवट : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय समारोहात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रम हर्षोल्लासात साजरा झाला. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कावली मेघना,भाप्रसे यांनी यावेळी झेंडावंदन केले.
याप्रसंगी आमदार भीमराव केराम, तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव , पीएम पोषण योजना अधिक्षक अनिल महामुने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. तसेच उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमा बाबत जनजागृती संदेश दिला. संगीत विशारद प्रा. आम्रपाली वाठोरे व तबला विशारद प्रा. शिवकुमार कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शर्वरी गिरीश पत्की, इशिता गिरीश पत्की, पद्मश्री श्रीराम वळसंगकर , धनश्री श्रीराम वळसंगकर , वंशिका रामकृष्ण केंद्रे, ऋचा रमाकांत चक्रावार व आकांक्षा प्रदीप कांबळे यांनी राष्ट्रगीत, राज्य गीत व "मेरे वतन मेरी जान है तू " हे देशभक्ती गीत सादर केले.
त्यानंतर राष्ट्रीय कोच संदीप यशिमोड यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीबाई सेवाभावी संस्था व सेल्फ डिफेन्स शोटोकॉन कराटे असोसिएशन नांदेड यांच्या विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणार्थ कराटे प्रात्यक्षिक सादर केले.
प्राचार्य एस. व्ही. रमणराव यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल कोठारी (चि) येथील नामांकित शाळेत प्रवेश योजनेतील आदिवासी मुलींनी " देश रंगीला रंगीला " या गीतावर फ्रीस्टाईल नृत्य व " मै रहूँ या ना रहूँ भारत रहना चाहिए " या गीतावर सेमी क्लासिकल नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली.
बबिता भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी "सुनो गौर से दुनियावालो.. " या गीतावर नृत्य व "जय हो.." या गीतावर डंबेल्स नृत्य सादर केले. निलेश भिलवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय किनवट येथील विद्यार्थिनींनी वृक्षा रोपणाचा संदेश देणारी नुक्कड नाटिका सादर केली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत स्वीप कक्षाच्या वतीने मतदार जनजागृती पथकातील शाहीर नरेंद्र दोराटे, ढोलकी वादक साहेबराव वाढवे , शाहीर हिरामण जाधव व गायक केशव केंद्रे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिकांच्या वारस मुक्ताबाई निवृत्ती सावते यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी नगराध्यक्ष हाजी ईसाखान सरदारखान , माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, आनंद मच्छेवार, समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे , माजी सभापती सोपानराव केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, सामाजिक कार्यकर्ते अशोक नेम्माणीवार, निवृत्त तहसीलदार उत्तमराव कागणे, नायब तहसिलदार विकास राठोड, आकाश जाधव, पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रमोद पोहरकर, विवेक ओंकार, प्रशांत कोरडे, अजय कदम, माजी नगरसेविका आशाताई कदम, सामाजिक कार्यकर्त्या गंगुबाई परेकार, सुरेश जाधव , गंगारेड्डी बैनमवार, प्रा.डॉ. आनंद भालेराव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक वारस, माजी सैनिक, बार्ताहर, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार रामेश्वर मुंडे , अव्वल कारकून कैलास कांबळे, राम बुसमवार, महसूल सहायक नामदेव धोंड, संतोष मुपडे, तलाठी सचिन भालेराव, शिवकांता होनवडजकर, अमोल वाघाडे, वन हक्क व्यवस्थापक महेश राठोड , संगणक चालक कविराज येरेकर, शिपाई खंडेराव मॅकलवार ,संतोष खंदारे , संदीप पुरके , कल्पना वाळके , हनुमंत दडांजे , चालक मनोज मगरे आदींनी परिश्रम घेतले.
*विविध ठिकाणी ध्वजवंदन*
येथील तहसील कार्यालयात व नगर परिषदेत तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर , पंचायत समितीत गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पीएम पोषण शक्ती निर्माण योजना अधिक्षक अनिल महामुने यांनी ध्वजवंदन केले.










No comments:
Post a Comment