बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन.....गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 24, 2024

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन.....गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

 



किनवट :  बदलापूर व महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी बालिका व महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत व गृह मंत्रालय अशा घटनांना आळा घालण्यात व राज्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरल्याने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करा व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याच्या  मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे  काळ्याफिती लावून जिजामाता चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

     बदलापूर व महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी बालिका व महिलांवर लैंगिक अत्याचारांच्या घटना झाल्या असून सदर प्रकरणात गृह मंत्रालयाची भूमिका ही संशयास्पद दिसून येत आहे.  ज्यामुळे  राज्यात अराजक निर्माण झाले की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  संशयास्पद भूमिका याबाबीस जबाबदार आहे.  

    सदर प्रकाराने किनवट तालुक्यातील सुज्ञ व संवेदनशील  जनता  व्यथित झाली आहे. त्यामुळे  तालुक्यातील जनतेच्या वतीने  बदलापूर, मुंबई, नाशिक, पुणे, अकोला, कोल्हापूर व महाराष्ट्र राज्यात व कोलकत्ता सह अनेक ठिकाणी बालिका व महिलांवर अत्याचार  व खून झाले व  दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या  वाढत चाललेल्या घटनांचा काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड , शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख मारुती दिवसे पाटील, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष के.सूर्यकांत रेड्डी, काँग्रेसचे शहराध्यक्ष  गिरीश ने म्माणीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शहराध्यक्ष  जहिरोद्दीन खान, शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख  प्रशांत कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष तथाकृषी उत्पन्न बाजार  समितीचे संचालक बालाजी बामणे,   उपसभापती राहुल नाईक , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) ज्येष्ठ नेते प्रवीण मॅकलवार, वसंत राठोड, अतुल दर्शनवाड, अमरदीप कदम, जयपाल जाधव, संचालक प्रेमसिंग जाधव, उप सरपंच राजू पाटील सुरोशे , शेख ताहेरभाई, नागनाथ भालेराव, लक्ष्मीपती दोनपेल्लेवार, शेख समीर, संतोष येलचलवार, शेख मोईस, महेश चव्हाण तंबाखूवाला, माधव खेडकर, संतोष मिरासे, संजय गरड पाटील, मनोहर श्रीराम, शेख इलियास, फारुख चव्हाण, बजरंग बडगुरे, शेख समीर, शरद कोत्तापेल्लीवार, अशोक साबळे, मारोती जीपकापे, शेख परवीन बेगम, सागर खंदारे, बालाजी शिरसाठ, प्रमोद जाधव, प्रमोद केंद्रे, मधुकर मेश्राम, जयवंत चव्हाण, गुलाब जाधव, केशव कराळे, शेख अब्दुल, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश गोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निषेध आंदोलनात बहुसंख्येने सक्रिय सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News