भगवान बुद्ध हे जागतिक शांततेचे प्रतिक -बौध्दाचार्य इंजि एम एम भरणे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 24, 2024

भगवान बुद्ध हे जागतिक शांततेचे प्रतिक -बौध्दाचार्य इंजि एम एम भरणे

 


परभणी :भगवान बुद्ध हे जागतिक शांततेचे प्रतिक आहेत असे प्रतिपादन  बौध्दाचार्य इंजि. एम. एम. भरणे यांनी केले. ते येथील नवजीवन काॅलनीतील वर्षावास  कार्यक्रमात वर्षावास प्रवचन मालीके निमित्त बोलत होते.

        वैशाली महिला मंडळांच्या  वतीने दर वर्ष्या प्रमाणे याही वर्षी वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. उपासिका छाया कसबे  ह्या

*भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म* या ग्रंथाचे वाचन दररोज दु 2.00  बुद्ध विहारात  करीत आहेत.

     त्यानिमित्त शनिवारी(ता. 24 ) ते बोलत होते. प्रथम त्यांनी तथागत सम्यक सम्बुद्ध व राष्ट्रनिर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.  त्यानंतर सर्वांनी त्रिसरण, पंचशील गृहण केले. प्रमुख पाहुण्यांचे  वैशाली महिला मंडळांच्या अध्यक्षा रोहीणी मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

      या प्रसंगी बौद्धाचार्य भरणे "बौद्ध धम्माची आचार संहिता"या विषयावर प्रवचन झाले.धम्माने  अज्ञानाचा अंधकार दूर करुन विषमतेचा धिकार केला  व माणसाला प्रेम, बंधुभाव  व विनय शिकविल्याचे सांगून बौद्ध धम्मचं जगात शांतता प्रस्थापित करू शकतो याबाबतचे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी धम समजून सांगितला.

      या प्रसंगी वैशाली महिला मंडळांच्या अध्यक्षा रोहीनी मोरे, सचिवा छाया कसबे, व वंदना नंद ,इंदुमती रोडे, मंदोदरी वाघमारे, कुसुम घोबाळे, सूर्यकला थीटे,आरव थीटे, त्रिशा कांबळे, तनुजा रोडे, नीता चव्हाण, सुषमा बनसोडे, मानसी वाव्हळे, नंदा कांबळे, सुमती मस्के, ज्योती मस्के,कमल खिल्लारे,शाम मोरे. इत्यादी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. इंदुमती रोडे यांच्या वतीने खिरदान खिरदान करण्यात आले.शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.


*रविराज पार्क येथे धम्मा ग्रंथाचे वाचन*

परभणी.- आपाढ पौर्णिमे निमित्ताने दरवर्षाप्रमाने याही वर्षी रविराज पार्क येथे वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.  धम्मज्योती महिला मंडळांच्या  वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपासिका रेखा ढगे ह्या *भ बुद्ध आणि त्यांचा धम्म* या ग्रंथाचे वाचन  .दररोज दु 2.00 नालंदा बुद्ध विहार येथे  करीत आहेत. त्यानिमित बौद्धाचार्य इंजि.एम. एम. भरणे यांनी आपल्या प्रवचन मालिके निमित्त *बौद्ध धम्माची अचार संहिता*. या विषयावर प्रवचन झाले. धम्माने माणसाला सदाचाराचा मार्ग सांगीतला. समतेचे तत्व अंगीकारले, अज्ञान व विषमतेचा धिकार करून माणसाला प्रेम व बंधुभाव शिकविल्याचे सांगून बौद्ध धम्म हा इतर धर्मा पेक्षा तात्विक दृष्ट्या  कसा आगळा नि वेगळा असल्याचे अनेक उदाहरणे देऊन समजून सांगितले.

या प्रसंगी सुलोचना सरपे, गयाबाई सोनकांबळे, सरीता भगत, सरोज वाघमारे किनवट , .विमल जाधव, ललीता वाकळे, माया एंगडे, कौशल्या ढाले, नेहा जमदाडे, संगीता जोगदंड, सुमन बडेराव, वछ्चला गायकवाड, लताबाई इंगोले, त्रिवेणी रणवीर, कमल गोबाडे, पार्वतीबाई इंगोले, संगीता घोबाळे, कमल इंगोले, पुष्पाताई पोटफोडे, वसंता शिंदे, सत्यभामा आळणे, संगीता मस्के, कविता आठवले, पद्मा इंगोले, वंदना गायकवाड, सुनिता जल्हारे, निलाबाई ढेंबरे, प्रतीमा कांबळे, गयाबाई वाघमारे, शोभा कांबळे, सुनंदा रंगारी, संगीता साळवे, शांताबाई कोपलवार, कांताबाई मनावर इत्यादी बहुसंखेन उपस्थित होते. शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.



*सदाचार हे धम्माचे खास वैशिष्ट्ये*

 - बौ इंजि एम एम भरणे 


परभणी.- आपाढ पौर्णिमे निमित्ताने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी  तुळजाभवानी नगरात वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. त्रिरत्न महिला मंडळांच्या  वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उपा पगारे नायबराव हे *भ बुद्ध आणि त्यांचा धम्म* या ग्रंथाचे वाचन  .दररोज दु 2.00 त्रिरत्न बुद्ध विहार येथे  करीत आहेत. त्यानिमित्त बौद्धाचाय इंजि एम. एम . भरणे यांचे  *बौद्ध धम्माचे खास वैशिष्ट्*. या विषयावर प्रवचन झाले. धम्माने दैविवाद व अंद्धश्रध्दा अमान्य केली व विज्ञानवाद स्विकारला.तसेच माणसाला सदाचाराचा मार्गसांगीतला हे या धम्माचे खास वैशिष्ट्ये असल्याचे सांगून बौद्ध धम्म हा इतर धर्मापेक्षा कसा आगळा नि वेगळा असल्याचे अनेक उदाहरणे देऊन समजून सांगितले.

     या प्रसंगी निलावती साळवे, वंदना पंडित, रुपाली सरपे, आशा मोरे, सुजाता वाघमारे, पौर्णिमा सरपे, शकुंतला काळे, पौर्णिमा धोटे, पद्मिनी वाकळे, पंचशीला कनकुटे, छायाबाई पगारे, सुनिता वैराट, गंगासागर सूर्यवंशी, सुनिता मुजमुले, चित्रलेखा हनवते, विमल साळवे, सखुबाई वाढवे, शोभा शिवभगत, उषा भुजबळ, दामोधरे बाई, तसेच विठ्ठल सूर्यवंशी, प्रकाश धाबे, सोपान शिवभगत, निवृती साबळे, माणीक वैराट, उत्तमराव शिंदे, अतुल वैराट इत्यादी बहुसंखेने महिला व उपासक  उपस्थित होते. शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News