किनवट : पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत असल्याने शनिवारी (ता.31) त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित केला आहे. सर्व शिक्षणप्रेमिंनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे , असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने केले आहे .
तालुक्यातील कोठारी (चिखली) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल येथे शनिवारी (ता. 31 ऑगस्ट 2024 ) दुपारी 12.00 वाजता होणाऱ्या सेवापूर्ती साहेळ्यास अध्यक्ष म्हणून किनवट विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम , विशेष अतिथी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कावली मेघना (भाप्रसे) व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद नांदेडच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे , माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर , योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुरेश कांबळे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत . तेव्हा या सोहळ्यास सर्व शिक्षण प्रेमिंनी उपस्थित रहावे, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने सेवापूर्ती सोहळा आयोजन समिती, शिक्षण विभाग, पंचायत समिती, किनवटच्या वतीने करण्यात आले आहे .





No comments:
Post a Comment