लक्ष्मण परसराम आढाव यांच्या निवृत्ती निमित सेवापूर्ती सोहळ्यात सहपरिवार सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, August 30, 2024

लक्ष्मण परसराम आढाव यांच्या निवृत्ती निमित सेवापूर्ती सोहळ्यात सहपरिवार सत्कार

 



हिमायतनगर : येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असणारे वरिष्ठ सहाय्यक लक्ष्मण परसराम आढाव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती  सोहळा आयोजित करून त्यांचा  सहपरिवार सत्कार करण्यात आला.

          किनवट तालुक्यातील दिगडी (धानोरा) येथील मूळनिवासी तथा दत्तनगर गोकुंदा येथील रहिवाशी आणि सध्या पंचायत समिती हिमायतनगर येथे वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत असणारे लक्ष्मण परसराम आढाव हे शनिवारी (ता. 31 ऑगस्ट 2024 ) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त आज शुक्रवारी (ता. 30 ऑगस्ट 2024) त्यांचा शेवटचा कार्यदिन असल्याने पंचायत समिती कार्यालयात त्यांना सहपरिवार निरोप देण्यासाठी  सेवापूर्ती सोहळा आयोजित  करण्यात आला होता.

       याप्रसंगी गटविकास अधिकारी पी. एम. जाधव व  पंचायत समिती , गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट येथील शिक्षक वृंद  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News