*मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त* *पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 16, 2024

*मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त* *पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण*

 


नांदेड, ता. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर  सकाळी  9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल. या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.   


समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये.  या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत. 


उद्या सकाळी 8.30 वा. पालकमंत्री गिरीश महाजन यांचे विसावा उद्यान येथे आगमन होणार आहे. त्यानंतर 8.40 वा. त्यांच्या हस्ते स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. अन्य मान्यवर देखील पुष्पचक्र अर्पण करतील. 8.48 वा. सशस्त्र सलामी दिली जाणार आहे. त्यानंतर 9 वा. राष्ट्रध्वजारोहण होईल. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री जिल्ह्याला संबोधित करणार आहेत. याशिवाय क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांच्या स्वातंत्र सैनिक परिवाराशी हितगुज झाल्यानंतर सकाळी 9.30 सुमारास सभास्थळावरील मुख्य कार्यक्रमाचा समरोपह होणार आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News