अनागारिक धम्मपाल जयंती, सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन अभिवादन व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त अभि. प्रशांत ठमके यांचा सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, September 19, 2024

अनागारिक धम्मपाल जयंती, सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन अभिवादन व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त अभि. प्रशांत ठमके यांचा सत्कार

 


किनवट : येथुन जवळच असलेल्या गोकुंद्याच्या राजर्षी शाहूनगरातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवटच्या वतीने बौद्ध धम्म पुनरुज्जीवक अनागारिक धम्मपाल यांची जयंती व  चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त  अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. 

           प्रारंभी प्रतिमा पुजन करुन संस्कार उपाध्यक्ष प्रा.सभाष गडलिंग व संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी वंदना घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईंचे मराठवाडाप्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक होते. यावेळी  शैक्षणिक क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी बद्दल नांदेड येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांचा व त्यांच्या सुविध पत्नी सावित्री बाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांचा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा व वार्ड शाखेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. 

       प्रमुख अतिथी भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस निवृत्त प्राचार्य राजाराम वाघमारे व अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे नांदेड जिल्हाकार्याध्यक्ष उत्तम कानिंदे यांनी सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर व अनागारीक धम्मपाल यांच्या आशियाखंडासह भारतातील धम्म प्रसार कार्यावर प्रकाश टाकला. तसेच सत्कारमूर्ती अभियंता प्रशांत ठमके यांनी  किनवट तालुक्यातील मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे दैदिप्यमान शैक्षणिक कार्य करुन आदिवासी डोंगराळ भागात शैक्षणिक क्रांती केली तसेच भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून धम्मचळवळ गतीमान करत सामाजिक सत्कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला. या प्रसंगी सत्कारमूर्ती यांनी  सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर व अनागारीक धम्मपाल यांच्या कार्याचा आढावा घेऊन विविध शाखेच्या वतीने भव्य सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करत मला मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार  हा माझा सन्मान नसून संस्थेच्या कार्याचा सन्मान असल्याचे प्रतिपादन केले. 

     याप्रसंगी यश रामराव घुले व आदर्श साहेबराव वाढवे यांची एम.बी.बी.एस. साठी निवड झाल्याबद्दल पालकांसह सत्कार करुन संस्थेच्या वतीने शुभांगी ठमके यांनी प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये बक्षीस दिले. तसेच सुयश प्रशांत ठमके यांची एम.बी.बी.एस. साठी निवड झाल्याबद्दल सत्कारमूर्तीचा सपत्नीक सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षिय समारोपात दादाराव कयापाक यांनी शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्य करणाऱ्या योग्य व्यक्तीची निवड करुन अभियंता प्रशांत ठमके यांना नांदेड येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

       नांदेड जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी सूत्रसंचलन केले.  वार्ड अध्यक्ष बंडू भाटशंकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे तालुका सरचिटणीस प्रा.डॉ.पंजाब शेरे, भारत कावळे, सुरेश पाटील, रमाकांत गायकवाड, प्रफुल डवरे, सतिश विणकरे, प्रवीण वाठोरे यांनी पुढाकार घेतला. यावेळी बुद्ध विहार समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. आनंद भालेराव, क्रांतिसूर्य प्रतिष्ठाणचे रमेश मुनेश्वर, शेषेराव पाटील आदींसह असंख्य उपासक,  उपासिका तसेच बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News