मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वातील एक महान विचारवंत आणि प्रेरणादायक नेतृत्व होते. जगभरात विशेषत: अमेरिका सारख्या मोठ्या देशात महाराष्ट्राचे सण व संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न होत आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले.
अमेरिकेत स्थायिक झालेले विजय पाटील यांनी प्रकाशित केलेला *छत्रपती शिवाजी महाराज* या पुस्तकाची प्रत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिली. याप्रसंगी डॉ. गोऱ्हे लतल होत्या.
विजय पाटील मागील पंचवीस वर्षां पासून अमेरिकेतील लाँस ऐन्जिलस या शहरात राहतात. त्यांनी तिथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रिय परिवार हा विचारमंच तयार केला आहे. या मंचाने जगभरातील १९० देशात व २५० शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची जपणुक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकावर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरती २०२३ कार्यक्रम त्यांनी साजरा केला होता. महाराष्ट्र संस्कृती परंपरा आणि शिवरायांचे शौर्य व त्यांची गाथा या कार्यक्रमात सादर केली होती. या निमित्ताने *छत्रपती शिवाजी महाराज* ग्रंथाचे प्रकाशन त्यांनी केले होते. या पुस्तकाची प्रत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिली.
विजय पाटील यांच्या या अनोख्या व गौरवास्पद कार्याचे कौतुक डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले व मुलींच्या सक्षमीकरणाबाबतही काम करावे असे सांगितले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विजय पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या या कार्यक्रमासाठी घेतलेल्या परिश्रमाचे अभिनंदन केले.




No comments:
Post a Comment