माकणी /लोहारा (धाराशीव) : येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत बी.एस.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय माकणीच्या बॉक्सिंगपटूंनी सात पदकांची कमाई करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व भारत शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय माकणी ता. लोहारा जि. धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 सप्टेंबर 2024 ते 22 सप्टेंबर 2024 रोजी अतिशय उत्साहात अंतर महाविद्यालयीन मुले-मुली बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. या बॉक्सिंग स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन (अण्णा) साठे (सरचिटणीस भारत शिक्षण संस्था उमरगा), चिटणीस पद्माकरराव हराळकर , डॉ. सुभाष वाघमोडे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. संदीप जगताप उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक वर्षा त्रिपाठी, क्रीडा मंडळ सदस्य प्रा. सुरेश मिरकर, प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली. पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे अनावरण करण्यात आले. भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून बॉक्सिंग रिंगची पूजा करण्यात आली व प्रत्यक्ष बॉक्सिंग लढत लावण्यात आली. न भूतो न भविष्यती अशा अतिशय उत्साहात बॉक्सिंग स्पर्धा रंगल्या, अतिशय तंत्रशुद्ध अशी बॉक्सिंगची रिंग महाविद्यालयात उभारण्यात आली.
भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांना, पंचांना व विविध महाविद्यालयातून आलेल्या क्रीडा संचालकांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. बॉक्सिंग स्पर्धेसाठी तांत्रिक पॅनल मध्ये लक्ष्मण कोळी, रविंद्र माळी, अजय जाधव, धनंजय बनसोडे (एन आय एस कोच) वानखेडे, वर्षा त्रिपाठी (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच) डॉ. परधणे आदींचा समावेश होता.
महाविद्यालयातील मेडल प्राप्त बॉक्सर्स खालील प्रमाणे : नबीलाल शेख :- सुवर्णपदक विजेता, साठे रोहिणी सुवर्णपदक विजेती, रोहित निवडुंगे रजतपदक विजेता, वैष्णवी घोडके रजत पदक विजेती, किरण साळुंखे रजत पदक विजेता, शिवप्रसाद मुळे रजत पदक विजेता, धनश्री तळेकर रजत पदक विजेती. भरगच्च अशा प्रेक्षकांनी बॉक्सिंग स्पर्धांचा आनंद घेतला. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत माकणी महाविद्यालयाने बॉक्सिंग मध्येही वर्चस्व सिद्ध केले. उद्घाटन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक म्हणाले की माकणी महाविद्यालयाचे नाव कुस्ती या खेळात अग्रगण्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुस्ती खेळ प्रकारात नेहमीच वर्चस्व राखलेले आहे. असंख्य महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय पदक विजेते, आशियाई रजत पदक विजेते या महाविद्यालयाने दिले आहेत. विद्यापीठाचे संचालक डॉ. संदीप जगताप महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ अनिल पाटील यांनी मेडल व प्रमाणपत्र वाटपाचे संचलन केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉ. सुरवसे, डॉ. मुंडे, डॉ. पतंगे, डॉ. खराडे, डॉ. जावळे, डॉ. बिरादार, डॉ. बिराजदार, डॉ. चोचंडे , श्रीमती गायकवाड, श्रीमती मस्के , डॉ. कदम, डॉ मोरे, डॉ. जयपाल सूर्यवंशी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर जगताप, संतोष सोमवंशी, सुरेंद्र कराड (लातूर), बिलकुले (तुळजापूर) महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. यशस्वी बॉक्सिंगपटूंना महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख अनिल पाटील यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले. या बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. क्रीडासंचालकांनी मार्गदर्शनपर भाषण केले. समारोपामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाच्या यशस्वी बॉक्सिंगपटूंचे भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे यांनी अभिनंदन केले व पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






No comments:
Post a Comment