बेला /आदिलाबाद ( गजानन खोब्रागडे) : तेलगाणा राज्याच्या अदिलाबाद जिल्ह्यातील बेला मंडळातील सोनखास गावात मंगळवारी ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक दिवस साजरा करण्यात आला.
गावात जोतिराव व सावित्रीबाई फुले दाम्पत्याच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर ग्रामस्थ, युवक आणि महिला सत्यशोधक दिवसा विषयी बोलतांना असे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले यांनी सामाजिक सुधारणेसाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे सत्यशोधक समाजाची स्थापन केली होती.
त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते की , दलित घटकांना विशेषतः महिलांना शिक्षण, राजकीय आणि आणि सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी ही चळवळ उभी केली आहे. त्याच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी महिला व अस्पृश्य समाजासाठी प्रथमच शाळा उघडली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिक्षणाला फळ मिळाले. पुढे ते म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरु मानले आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा अभ्यास करून त्यांचा आदर्श घेऊन संविधानात सर्वांना समान अधिकार दिले.
ते म्हणाले की, ब्राह्मणांना कोणत्याही उपक्रमात न बोलवता, तरुण आणि ज्येष्ठांना उदाहरण म्हणून घेऊन त्यांनी सांगितलेल्या तिसऱ्या समजुतीवर विश्वास न ठेवता फुले दाम्पत्याचा विचारांचे सर्वांनी पालन केले पाहिजे. या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष अंबादास शेंडे, गावचे अध्यक्ष नंदू नागोसे, माजी सरपंच जनार्दन मेश्राम, राजाराम, सुनील, दीपक, फकरू, वीणा, ग्रामस्थ, युवक व महिला सहभागी झाल्या होत्या.




No comments:
Post a Comment