रेणापूर ग्रामपंचायतीला गांधी व शास्त्री जयंतीचा विसर ; सीईओंचा आदेश धुडकावला स्वच्छता उपक्रम घेतला नाहीच #निष्क्रीयतेस जबाबदारांवर कार्यवाही करावी : -डॉ. कैलास कानिंदे रेणापुरकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, October 2, 2024

रेणापूर ग्रामपंचायतीला गांधी व शास्त्री जयंतीचा विसर ; सीईओंचा आदेश धुडकावला स्वच्छता उपक्रम घेतला नाहीच #निष्क्रीयतेस जबाबदारांवर कार्यवाही करावी : -डॉ. कैलास कानिंदे रेणापुरकर

 



भोकर : तालुक्यातील मौजे रेणापूर  येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान तर राबविले नाही, ना त्या विषयी प्रचार प्रसार सुध्दा केला नाही. तसेच  राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत प्रधानमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या  जयंतीचा रेणापूर ग्रामपंचायतीला विसर पडला आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदारांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी उच्च विद्य विभूषीत ग्राम पंचायत सदस्य  डॉ. कैलास कानिंदे रेणापुरकर यांनी केली आहे. 

       राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, असा विशेष उपक्रम नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले असतांना सुद्धा  मौजे  रेणापूर ग्रामपंचायत १२ महिन्यापासून मासिक सभा व ग्रामसभा घेतली नाही. फक्त मलिदा कसा फस्त करता येईल यामध्येच ते पटाईत आहेत. महापुरुषाची जयंती करणे ही ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व उपसरपंच यांची जबाबदारी असते. पण येथे उलटच पाहायला मिळते. तालुका स्तरावरील सर्व अधिकारी मिलीभगत असल्यामुळे असे प्रकार होतांना दिसत आहेत. स्वच्छता अभियान राबविणे ,महापुरूषाची जयंती साजरी करण्यासाठी शासनाचे आदेश असतानाही येतील रेणापुर  ग्रा.प. ला गांधी जयंतीचा विसर पडला आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतील या कडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



ग्रामपंचायत अधिकारी व सेवकावर कार्यवाही करा : डॉ. कानिंदे

 रेणापूर ग्रामपंचायत सदस्य  डॉ. कैलास कानिंदे यांनी सेवक मुबीन पठाण यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून विचारण केली की , "महात्मा गांधी जयंती साजरी केली काय ? " "ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते " असे त्यांनी उत्तर दिले. "फोटो पाठवा " असे म्हटल्यावर "फोटो रोजगार सेवक विनोदकडे आहेत " असे उत्तर मिळाले.  विनोद यांना संपर्क  केला असता "माझ्याकडे फोटो नाहीत " असे त्यांनी सांगितले.  तेंव्हा पुनःश्च  सेवक मुबीन पठाण यांना भ्रमणध्वनी केला तेव्हा तेव्हा ते म्हणाले , " विनोद चा फोन लागत नाही म्हणून उडवा उडवीची उत्तरे दिली. " ग्राम पंचायत सदस्य  डॉ. कैलास कानिंदे यांना  का बोलाविले नाही ?" असे विचारल्यावर "मला काही माहित नाही ". सेवकास दुपारी ३ वाजता फोनवर  ग्रामपंचायतला या मला म.गांधी जयंती कुठे केली दाखवा  ग्रामपंचायत उघडून दाखवा म्हणाल्यावर मी शेतात आहे असे उत्तर सेवक मुबीन पठाण यांनी दिले.व पुन्हा फोन बंद करून ठेवला असल्याने सदरील प्रकरणाची योग्य ती चौकशी करून ग्रामपंचायत अधिकारी , सेवक , सरपंच व  उपसरपंच यांच्यावर  उचित कार्यवाही करावी , अशी मागणी डॉ. कानिंदे यांनी  केली आहे. तसेच  ग्रामपंचायतीच्या निष्क्रीय दृष्टिकोनास कोण जबाबदार आहे ?. याचा तपास करावा. ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व उपसरपंच यांना राष्ट्रपिता म . गांधी व दिवंगत प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा विसर पडल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबीत करावे, असे रेणापूर येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News