किनवट : मतदार जनजागृती (स्वीप) कक्षाच्या वतीने महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी किनवट मध्ये महिलांची प्रश्नमंजुषा (स्वीप क्वीझ) आयोजित करण्यात येत आहे. याला शहरी भागासह ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून याप्रसंगी महिलांकडून "आम्ही मतदान करणारच " असे अभिवचन मिळत आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल प्रमुख मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 83- किनवट विधानसभा मतदार संघात सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या संकल्पनेतील मतदार जनजागृती स्वीप कक्षाच्या वतीने महिलांची प्रश्नमंजुषा (SVEEP QUIZ) आयोजित करण्यात येत आहे.
गट शिक्षणाधिकारी तथा कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वात सिद्धार्थनगर, गोकुंदा येथे महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महिलांची प्रश्नमंजुषा (स्वीप क्वीझ) घेण्यात आली. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या माया सुरेश कसबे , सुनिता अनिल उमरे, इंदूताई कनिंदे , गंगानगर किनवट येथे छाया शंकर बहादुरे , अंजली विशाल मेटकर , सूर्यकांता भानुदास नरवाडे , सारखणी येथे सुनिता राहूल भवरे यांना स्वीप क्वीझ स्टीकर SVEEP QUIZ स्टीकर लावून भेट वस्तू देण्यात आल्या. यावेळी महिला मतदारांनी उत्स्फूतपणे " मी मतदान करणारच " असे अभिवचन दिले.
याप्रसंगी स्वीप सदस्य केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे, उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे , प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी , रमेश मुनेश्वर, सुरेश पाटील , रुपेश मुनेश्वर , शेषराव पाटील , सुरज पाटील , भूमय्या इंदूरवार , सारंग घुले, सचिन कोंडापलकुलवार, मल्लिकार्जून स्वामी , बीएलओ यमुना राठोड , राजू भातनासे , विनोद गुरनुले व महिलांसह बहुसंख्य मतदार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment