नांदेड : नालंदानगर येथील रहिवाशी तथा वसंतराव नाईक महाविद्यालय, वसरणी येथील मराठीच्या प्राध्यापिका नागिणताई शामराव मुनेश्वर (वय 64 वर्षे) यांचे बुधवारी(ता. 30 ऑक्टोबर 2024 ) सकाळी 11.25 वाजता एका खासगी रुग्लायात उपचार सुरू असतांना निधन झाले. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा.
गुरुवारी( ता.31/10/2024 ) सकाळी 11.15 वाजता नालंदानगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची प्रेतयात्रा निघणार असून त्यांचे पार्थिव शांतीधाम गोवर्धनघाट येथे पोहचल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात खडकी (बा) ता. हिमायतनगर येथील मूळनिवासी तथा हल्ली नालंदनगर येथील रहिवाशी पती शामराव किशनराव मुनेश्वर, एम.बी.बी.एस. शिक्षित तेजस्विनी मुनेश्वर ही मुलगी, चेतन मुनेश्वर व अतुल मुनेश्वर ही दोन मुलगे असून मनोहर पाटील व प्रा. डॉ. अनिल पाटील यांच्या त्या भगिणी होत.
No comments:
Post a Comment