किनवट : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मा. भारत निवडणूक आयोगाचा कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित करण्यात आला आहे. त्यानुषंगाने विधानसभा निवडणूकीसाठी दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. सदरील 83 किनवट विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी मा. भारत निवडणूक आयोगाने मा. श्री. शैलेंद्रकुमार (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरिक्षक (सामान्य) म्हणुन नियुक्ती केली आहे. त्यांचा Observer code- G-35602 हा असुन भ्रमणध्वनी क्र. 7499127265 असा आहे. मा. निवडणूक निरिक्षक हे दि.20/11/2024 रोजीच्या मतदानांच्या दिवशी तसेच मतदानानंतर छाननी दि. 21/11/2024 रोजीच्या कालावधीत निवडणूक निरीक्षक कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोकुंदा ता. किनवट येथे उपलब्ध राहणार आहेत. ज्या उमेदवारांना व त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना मतदान संदर्भात काही अडीअडचणी असल्यास प्रत्यक्ष भेटू शकता किंवा त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधु शकतात. असे 83 किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी कळविले आहे.




No comments:
Post a Comment