किनवट : 83 किनवट विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 202 सुसंस्कार मतीमंद विद्यालय, गोकुंदा येथे तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांची उपस्थिती होती.
गोकुंदा ग्रामपंचायत अंतर्गत हबीब कॉलनी येथे असलेल्या सुसंस्कार मतीमंद विद्यालयातील 222 मतदान केंद्राच्या यादीत शहाना हसीना शेख , सलमा शेख , मुस्कान शेख , ज्यूली किशन सुर्यवंशी, साक्षी सरोदे, मोना पांडुरंग या तृतीय पंथी मतदारांची नावे आहेत. हे मतदार मतदानासाठी आले तेव्हा सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) तसेच मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे , मल्लीकार्जून स्वामी , रुपेश मुनेश्वर , सुरेश पाटील , शेषराव पाटील , मनोज कांबळे , बीएलओ गंगासागर मुखाडे आदिंची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment