*सह्याद्री वाहिनीवरील ‘वाचू आनंदे’ विशेष कार्यक्रम – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व सुप्रसिद्ध कवी श्री. प्रविण दवणे करणार विंदा करंदीकरांच्या साहित्याचे अभिवाचन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 24, 2025

*सह्याद्री वाहिनीवरील ‘वाचू आनंदे’ विशेष कार्यक्रम – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व सुप्रसिद्ध कवी श्री. प्रविण दवणे करणार विंदा करंदीकरांच्या साहित्याचे अभिवाचन*

 



मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : प्रसिद्ध कवी आणि लेखक विंदा करंदीकर यांच्या निवडक कविता व साहित्याचा अभिवाचन विशेष कार्यक्रम ‘वाचू आनंदे’ लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती, लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे आणि कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या सादरीकरणातून हा साहित्यिक ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे.


हा विशेष कार्यक्रम २४ आणि २५ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार असून, पुनःप्रसारण २६ आणि २७ मार्च दुपारी ३.३० वाजता होईल. उत्तरा मोने यांनी या कार्यक्रमासाठी संशोधन व संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे.


डॉ. नीलम गोऱ्हे यांचा साहित्यप्रेमी दृष्टिकोन आणि अभिवाचन शैली प्रेक्षकांना निश्चितच एका आगळ्यावेगळ्या अनुभवाचा आनंद देईल. विंदा करंदीकर यांच्या गूढ, तत्त्वचिंतनपर आणि हृदयस्पर्शी कवितांचा हा प्रवास रसिकांना त्यांच्या साहित्यसंपदेकडे नव्याने नेईल.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News