शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त 24 जानेवारी रोजी भव्य मिरवणूक ; मिरवणूकीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी व फुलांची सजावट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, January 22, 2026

शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त 24 जानेवारी रोजी भव्य मिरवणूक ; मिरवणूकीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी व फुलांची सजावट




नांदेड, ता. 22 जानेवारी :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमस्थळी दोन्ही दिवस श्री गुरुग्रंथ साहिब विराजमान राहणार आहेत. 


या अनुषंगाने 24 जानेवारी रोजी सकाळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा ते मोदी मैदान पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असून त्यावर हेलिकॉप्टरने पुष्पृष्टी करण्यात येणार आहे. संपूर्ण मिरवणूक मार्ग फुलांनी सजविण्यात येणार आहे.


ही भव्य मिरवणूक भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती व आध्यात्मिकतेचा अविस्मरणीय अनुभव ठरणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News