ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर सीईओ महेश पाटील यांचा भर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 1, 2026

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर सीईओ महेश पाटील यांचा भर




नांदेड, ३१ - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा गुरुवार दिनांक ३० जुलै रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

     बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी अभियानाची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. लखपती दीदी स्लिप-बॅक एन्ट्री तातडीने पूर्ण करणे, तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनी बीएलबीसी बैठकीस नियमित उपस्थित राहणे, बचत गटांचे कर्ज प्रस्ताव वेळेत बँकांकडे सादर करणे तसेच पीएमईजीपी व सीएमईजीपी योजनांचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

     याशिवाय सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत समूह बांधणीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे, प्रभाग संघांचे प्रस्ताव पुढील आठवड्यापर्यंत धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे सादर करून मंजुरी मिळविणे, समूह सदस्यांची ई-केवायसी आणि आधार पडताळणी निर्धारित मुदतीत पूर्ण करणे, तसेच RF, CIF, VRF, MKSP आणि OSF अंतर्गत निधी प्रस्ताव वेळेत जिल्हा कक्षाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

     बैठकीस प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार, जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, बालप्रसाद जंगिलवाड, माधव भिसे, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक तसेच प्रभाग समन्वयक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News