किनवट :
किनवट तालुक्यातील बोधडी ( बुद्रूक ) वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यकक्षेतील डोंगरगाव येथे अवैध फर्निचर मार्टचा व्यवसाय चालु असल्याची खबर वनविभागाला मिळताच सोमवारी ( ता. २७ ) धाड घालून एक ट्रॅक्टर सागवान कटसाईज माल धरण्यात आला. निळकंठ शेळके यांच्याच घरात बिनधास्त हा व्यवसाय चालु होता. रंगेहात धरुण कार्यवाही करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी श्रीकांत जाधव यांनी सांगितले.
माहिती मिळाल्यावरुन सोमवारी डोंगरगावी सापळा रचून सहाय्यक वनसंरक्षक ( रोहीयो ) व्ही.जी.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांनी वनपाल सोनकांबळे, वनरक्षक मालेवार, वैशाली पंधरे, प्रियंका कुडमेते, शोभा गाढेकर, एच.डी.गवळी, पाटील यांच्यासह अन्य कर्मचा-यांचा ताफा घेऊन निळकंठ शेळके यांच्या घरावर छापा मारला. त्यात अवैध सागवान लाकडाचे ८५ नग १.२५१ घनमीटर एक लाख, दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
No comments:
Post a Comment