मंगळवारी जिल्हा परिषदेत सुप्रसिद्ध गायिका सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा भीम गीताचा कार्यक्रम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 28, 2019

मंगळवारी जिल्हा परिषदेत सुप्रसिद्ध गायिका सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा भीम गीताचा कार्यक्रम


नांदेड :
जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी राष्ट्रपिता जोतीराव फुले आणि राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मंगळवारी (ता.28 )  जिल्हा परिषद प्रांगणात सायंकाळी 6 वाजता सुप्रसिद्ध गायिका शाहिरा सीमा पाटील आणि गायक संगीतकार जॉली मोरे यांच्या संचाचा भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. यावेळी महापुरुषांचे तसेच महानायिकांचे वास्तववादी विचार दर्शन रसिकांना होणार आहे.
            जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन उपाध्यक्ष समाधान जाधव करणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, महिला व बालकल्याण सभापती मधुमतीताई कुंटुरकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, व्ही. आर. कोंडेकर, जी. एल. रामोड, एस. व्ही.  शिंगने, समाज कल्याण अधिकारी एस. के. मिनगीरे, कार्यकारी अभियंता मिलिंद गायकवाड, व्ही. एम. मीठेवाड, पी. एस.  मुंडे, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, शिक्षणाधिकारी (मा) बी. आर. कुंडगीर, शिक्षणाधिकारी (प्रा) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (नि.शि.) अशोक देवकरे आदींची उपस्थिती राहणार आहे.
         एक निळा आणि एक भगवा..., सारा देशच जयभीमवाला..., जिजाऊ, सावित्री, रमाईवाणी बनुन दावा तुम्ही... अशी एकापेक्षा एक गीतं सादर करणाऱ्या मुंबई येथील गायिका सीमा पाटील आणि जॉनी मोरे यांचा नांदेड शहरात प्रथमच कार्यक्रम होत आहे. तरी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे  आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तम सोनकांबळे, कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड, सचिव बालासाहेब लोणे, उपाध्यक्ष छाया कांबळे, कोषाध्यक्ष एस.एस. ओहळ व जयंती मंडळाचे पदाधिकारी यांनी केले आहे. प्रसिद्धीप्रमुख मिलिंद व्यवहारे, विलास ढवळे व गणेश आंबेकर यांनी ही माहिती दिली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News