सुप्रसिध्द गायिका-शायरा सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा भिम गितांचा कार्यक्रम नांदेड जिल्हा परिषदेत काल संपन्न झाला. एकापेक्षा एक बहारदार गीते सादर करुन संचांनी रसिकांची मने जिंकली.
जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी भिम जयंती मंडळाच्या वतीने मंगळवारी ( 28 मे ) जिल्हा परिषद प्रांगणात सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, डॉ. दिनेश निखाते, संतोष वारकड, जयंती मंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तम सोनकांबळे, सचिव बालासाहेब लोणे, उपाध्यक्ष छाया कांबळे, प्रसिध्दी प्रमुख मिलिंद व्यवहारे, लॉर्ड बुध्दा चॅनलचे सदाशिव गच्चे, एल.ए. हिरे, अरुण आळणे, आनंद कीर्तने, सुभाष लोणे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते कलावंताचा पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
एक निळा एक भगवा... दाही दिशामध्ये लावीला दिवा.. एक वाघाचा अन् एक सिंहाचा छावा... जिजाईचा तो शिवा अन् भिमाईचा तो भिवा..., तिरंगा झेंडयावर अशोक चक्र.... सारा देशचं जयभिमवाला..., काखेत लेकरु, हातात धरलंय.. डोईवर शेणाची गाठी, कपडा ना लत्ता, खायाला भत्ता, फजिती होती बाय मोठी, माझ्या भिमानं माय सोन्यानं भरली ओटी...., बहुजनातील शुर महिलांनी पावनं केली भूमी गं.. अशी जिजामाता सिवित्री रमाईवाणी बनून दवा तुम्ही हो.... अशा एकपेक्षा एक बहारदार गीतं सादर करुन सुप्रसिद्ध गायिका शाहिरा सीमा पाटील आणि गायक संगीतकार जॉली मोरे व त्यांच्या संचांनी रसिकांची मने जिंकून घेतली. यावेळी या संचामार्फत गितांच्या माध्यमातून मंचावर महापुरुषांचे तसेच महामातेचे वास्तववादी दर्शन घडवून आणले. त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली होती. तथागत भगवान गौतम बुध्द, संत कबीर, संत गाडगेबाबा, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आदी महापुरुषांचे वास्तवादी विचार दर्शन गीतांच्या माध्यमातून करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. अनंत राऊत, सतिश कावडे, रमेश कदम, अशोक कुबडे, प्रविण गायकवाड, रमेश सरोदे, विजय गोडबोले, भगवान गायकवाड, रंगनाथ गव्हाणे, गयाताई कोकरे, अशोकराव बेंद्रीकर, जनार्धन जमधाडे, प्रकाश लांडगे, अॅड. गौतम सावते, सुभाष काटकांबळे, सुभाष लोखंडे, विस्तार अधिकारी जीवन कांबळे, पत्रकार प्रकाश कांबळे, नरेश दंडवते, प्रशांत गवळी, दिपंकर बावीसकर, विजय निलंगेकर, डॉ. विलास ढवळे, डॉ. नंदलाल लोकडे, नंदू कांबळे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी व नांदेड शहर व जिल्हयातील हजारो रसिकांची उपस्थिती होती.





No comments:
Post a Comment