माहूर :
तालुक्यातील मौजे पडसा येथे बुधवारी (ता.२९ ) सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड व रमामाता महिला बचत गटाच्या वतीने आयोजित बौद्ध व सर्व धर्मीय विवाह मेळाव्यात तब्बल ४८३ जोडपे विवाह बंधनात गुंतले असून हा विवाह मेळावा तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठा असून जिल्ह्यातही ऐतिहासिक ठरला आहे. यामध्ये १५८ बौद्धधर्मीय ,१६४ हिंदू धर्मीय, १५७ आंतरजातीय व ४ मुस्लिम धर्मीय असे एकूण ४८३ जोडपे विवाहबद्ध झाले आहेत.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उमरखेड मतदार संघाचे माजी आमदार विजयराव खडसे, तर उद्घाटक अॅड.हरदड़कर नांदेड़ हे होते. माहुर नगर पंचायत सभापति अश्विनीताई तूपदाळे, किनवट तालुका सरपंच संघटनेच माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र कांबळे, कोंग्रेसचे माहुर शहराध्यक्ष आनंद पाटिल तुपदाळे, मनोज कीर्तने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माहूर तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, प्राचार्य भगवानराव जोगदंड, डी.डी.चव्हाण, राहुल भगत, सिद्धार्थ तामगाडगे , किशोरजी भगत यवतमाळ , तथागत कावळे महागाव, नंदुजी क़ावळे महागाव, कृष्णाजी मुनेश्वर पोखरी, श्रीरामजी मुनेश्वर अंबोडा, सखारामजी घुले किनवट, आनंदराव कांबळे पारवा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पूण अभिवादन करण्यात आले. बौद्ध, इस्लाम व हिंदू धर्मीय विवाह विधिवत करण्यात आले. आयोजकांनी सुरुची भोजनाची चोख व्यवस्था ठेवल्याने विवाहनंतर सर्व वऱ्हाडी मंडळीना शिस्तीत अगत्यपूर्वक भोजन देण्यात आले. गत पंचवीस वर्षापासून अविरतपणे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्व धर्मीय विवाह मेळावा आयोजनाने नागरिकांची वेळ व पैशाची बचत करून मदतीचा हात देण्याच्या उ प्रयत्न होतो आहे. उदात्त भावनेने भव्य दिव्य विवाह मेळावा आयोजित करून अस्सल जनसेवा केल्याने सर्व समाजबांधवांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड व त्यांचे चिरंजीव युवा नेते डॉ.सत्यम प्रकाश गायकवाड यांचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला.
मेळावा यशस्वी करण्यासाठी कुमार कांबळे, आकाश भवरे, प्रदीप भगत, मारोतराव कांबळे, विष्णू शेंडे, संतोष उमरे, सम्यक भवरे, शशिकांत भगत, सुरेंद्र शेंडे, हर्ष भवरे व रमामाता महिला बचत गट पडसाचे सर्व सदस्य व आयोजन समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता मेळाव्यासाठी परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थिती होती .





No comments:
Post a Comment