भारतीय बौद्ध महासभा व प्रज्ञापर्व यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद येथे बुद्ध जयंती साजरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 21, 2019

भारतीय बौद्ध महासभा व प्रज्ञापर्व यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद येथे बुद्ध जयंती साजरी



पुसद ( नरेंद्र पाटील ) :
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका  शाखा पुसदच्या वतीने महावीर नगर येथील स्थानीय समाज मंदिर येथे त्रिगुण बुद्ध जयंतीचे औचित्य साधून बौद्धाचार्य दहा दिवशीय श्रामनेर शिबिराचे आयोजन केले आहे.
             बौद्ध धम्मीयांना बौद्ध भिक्खुंचे महत्व व कार्य यांची माहिती व्हावी. बौद्ध भिक्खुबद्दल आदरआणि श्रध्दा निर्माण करण्याच्या द्रष्टीकोणातून भारतीय बौद्ध महासभा शाखा पुसद दरवर्षी अशा प्रकारचे नियोजन करीत आहे. यावेळेस भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्खुसंघासहित पुसद येथील तिन पुतळ्यापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भिखुसंघ आणि बौद्ध उपासक - उपासिका यांनी मोठ्या जल्लोशात कॅन्ड्ल मार्चचे आयोजन केले होते. प्रथमतः तिन पुतळ्यासमोर उपस्थित बौद्ध उपासक - उपासिका यांनी अष्टशील उपोसथ शीलाची भिक्खुना याचना करून पूज्य भिक्खुगनांनी उपासक -उपासिकाना अष्टशील प्रदान केले. यावेळेस विद्यमान प्रज्ञापर्व अध्यक्ष सुखदेवराव भगत, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष भारत कांबळे, दिलीप कांबळे या मान्यवरांनी तिन्ही पुतळ्याना अभिवादन करून रॅलीची सुरुवात केली. तथागत गौतम बुद्ध रूप सुशोभित केलेल्या चित्ररथाचे मुख्य आकर्षण होते.आदर्श बौद्धधम्मातील विविध घोषणानी शहर दुमदुले. ही रॅली शहरातील मुख्य मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मार्गस्थ झाल्यानंतर या रॅलीचे सभेत रुपांतर झाले. येथे सुध्दा उपासक-उपासिकांनी भिक्खुना याचना केल्यानंतर त्यांनी आशीर्वाद व धम्मदेशना दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुखदेव भगत  होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन गणेश वाठोरे, सुरेश कांबळे, नरेंद्र पाटील, साहेबराव गुजर, दादाराव आगामे, विशाल डाके, संदीप कावळे, विक्रांत डाके, सुरज हाडसे, प्रणव भागवत, रायबोले , नितीन खाडे, यादवराव जांबळुणकर ईत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी ज्ञानोबा कांबळे केंद्रीय शिक्षिक, मुंबई, सुजाताताई सोनोने केंद्रीय शिक्षिका, मुंबई यांनी भिक्खु व संघाबद्दल विशेष असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत कांबळे, भगवान बरडे, संजय पाईकराव, डी.जी.कांबळे, संतोष सोनोने, प्रल्हाद खड़से, राहुल पड़घने, बाळासाहेब ढोले, तसेच पुसद येथील सर्व विविध महिला मंडळे,तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटना,विविध कर्मचारी संघटना यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक भवरे यांनी केले. तर प्रा.विलास भवरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपासक -उपासिका उपस्थित होते.सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News