किनवट ( शब्दांजली कानिंदे ) :
धम्मचक्र बुध्द विहार घोटी येथे बुधवारी (ता. 22) तथागत सम्यक सम्बुध्द यांच्या रुपाची प्रतिष्ठापणा पूज्यनिय भिक्खू संघाच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यानिमित्त होणाऱ्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमास बहुसंख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी (ता. 22) सकाळी 9 वाजता ध्वजवंदन व साडेनऊ वाजता तथागत सम्यक सम्बुध्दांच्या रुपाची गावातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता धम्मचक्र बुद्धविहारात तथागत सम्यक सम्बुद्धांच्या रूपाची प्रतिष्ठापणा करून पूज्य भदंत विनयबोधीप्रिय थेरो व पूज्य भदंत शिलरत्न ( नांदेड ) धम्मदेसना देतील. यावेळी रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, भारतीय बौद्ध महासभेचे आदिलाबाद जिल्हाध्यक्ष गंगाराम बोरेकार, नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. वि. वा. एंगडे व कोषाध्यक्ष माधव सर्पे यांची विशेष उपस्थिती राहील. डॉ.यू. बी. मोरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, डॉ. महेंद्र कांबळे, सुभाष कयापाक, जितेंद्र कांबळे, अॅड. दीपक ठमके, गोकुळ भवरे, डॉ.संजय लोमटे, महेंद्र पटेकर, सुरेश पाटील, प्रवीण गायकवाड व दीपक ओंकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दुपारी 4 ते सायंकाळी 7 च्या दरम्यान भोजनदान असेल. सायंकाळी साडेसात वाजता पूज्य भदंत झेन मास्टर शाक्यबोधीधम्मा ( महाध्यानभूमी, तामसी ) धम्मदेसना देतील.
रात्री साडेआठ वाजता माजी नगराध्यक्ष मोहन मोरे (पूर्णा ) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या प्रबोधन सभेचं उद्घाटन किनवट नगर परिषदेचे सभापती कैलास भगत हे करतील. यासभेत सर्वजीत बनसोडे ( पूणे ), अॅड. के.के. साबळे व बौध्दाचार्य एम.एम. भरणे ( परभणी ) हे प्रमुख वक्ते विचार मांडतील. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरूण आळणे, समता सैनिक दलाच्या अॅड. स्मिता कांबळे ( नागपूर ), बौध्दाचार्य के.पी. धुतमल ( परभणी ) व भारतीय बौध्द महासभेचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष राम भरणे यांची विशेष उपस्थिती राहील. रात्री साडेनऊ वाजता भीमशाहीर माधव वाढवे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौध्द महासभा, रमामाता महिला मंडळ व समता सैनिक दल शाखा घोटी यांनी केले आहे.





No comments:
Post a Comment