वनविभागाने सिनेस्टाईल पाठलाग करून लाकूड तस्करासह ४५ हजाराचा मुद्देमाल घेतला ताब्यात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 10, 2019

वनविभागाने सिनेस्टाईल पाठलाग करून लाकूड तस्करासह ४५ हजाराचा मुद्देमाल घेतला ताब्यात

वनविभागाने सिनेस्टाईल पाठलाग करून लाकूड तस्करासह ४५ हजाराचा मुद्देमाल घेतला ताब्यात 


किनवट :
चिखली (बुद्रूक ) गावातून अवैद्य कट साइज सागवाने भरलेला ऑटो  येत असल्याची गुप्त खबर मिळाल्याने सिनेस्टाईल पाठलाग करून कोठारी ( चिखली ) गावाजवळ  वनविभागाने एका लाकूड तस्करासह ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
           १५ हजार २३५ रुपये  किमतीचे कट साईज सागवानासहित तीस हजार रुपये  किमतीचा ऑटो जप्त केला ; तर यापूर्वीच्या अनेक कारवाईत मुद्देमाल सोडून आंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळाल्याचे सांगितले जात होते. परंतु एका आरोपीस अटक करण्यात यश मिळविले आहे. वन विभागाच्या या कारवाईने चिखली येथील लाकूड तस्करात खळबळ उडाली आहे.
              याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (ता. १० ) सायंकाळी सहा वाजता  चिखली ( बुद्रूक ) येथून कट साइज सागवाने  भरलेला ऑटो  किनवट कडे येत असल्याची  गुप्त सुचना  किनवटचे   वनपरिक्षेत्र अधिकारी के. एन. खंदारे   यांना मिळाली. उपवनसंरक्षक आशिष ठाकरे सहाय्यक वनसंरक्षक डॉ.राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यासह चिखलीच्या  दिशेने कूच केली. गोकुंदा येथे वनविभागाच्या पथकाला बघून  ऑटो चालकाने पलटवून परत चिखली च्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी  गोकुंदा ते कोठारी या रस्त्यावर  वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कोठारी गावाजवळ अॅटोला पकडण्यात यश मिळविले.  यावेळी  वन विभागाला एक आरोपी पकडण्यातही  यश आले.  वनविभागाने आरोपी सय्यद यास पकडल्यामुळे चिखली ( बुद्रूक ) येथील लाकूड तस्करात खळबळ माजली आहे.  वन विभागाच्या या कारवाईत  १५ हजार २३५ रुपये किमतीचे  ४२  सागवानाचे नग (० .२४४० घन मीटर )  असून तीस हजार रुपये किमतीचा ऑटो सहित अंदाजे ४५ हजार रुपये किमती एवढा  मुद्देमाल जप्त करण्यात आला.  वन अधिनियम १९२७ नुसार चिखली ( बुद्रूक ) येथील  लाकूड तस्करावर गुन्हा नोंद करण्यात आला असून  पुढील तपास चालू आहे.  वन विभागाच्या पथकात फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके , वनपाल गायकवाड , शेख फरीद , सांगळे, वनरक्षक चुकलवार , दांडेगावकर , घोरबांड , यादव , सोनार, ठवरे ,वैद्य  वाहन चालक आवळे व  भुतनर आदी वन कर्मचारी होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News